IPL 2020 : पदार्पणात केला धमाका; आता अनन्या पांडेसोबत जायचेय डेटवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 15 April 2021

IPL 2021 : गुरुवारी, राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघासोबत होणार आहे. पहिल्या विजयासाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरले.  
 

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून दमदार पदार्पण करणाऱ्या  वेगवान गोलंदाज चेतन सकारिया (Chetan Sakariya) याची बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांड्या (Ananya Panday)हिच्याबरोबर डेटवर जायची इच्छा आहे. चेतन सकारिया याने सोमवारी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पंजाब किंग्स (Punjab Kings) विरोधात पदार्पणातच तीन विकेट घेत चर्चेत आला.  मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) झालेल्या सामन्यात सकारियाने चार सामन्यात ३१ धावा देत तीन बळी घेतले.  राजस्थाननं लिलावात चेतनला एक कोटी २० लाख रुपयात खरेदी केलं होतं. राजस्थान रॉयल्सनं आपल्या ट्विटरवर चेतन आणि आकाश सिंह (Aakash Singh) यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते एकमेंकाची मुलाखत घेताना दिसत आहेत. 

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) चेतनचा आदर्श आहे.  युवराजची फलंदाजी पाहून चेतनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.  सोमवारी पदार्पण करणाऱ्या चेतन यानं मयंक अग्रवाल आणि राहुल सारख्या दिग्गज फलंदाजांना बाद केलं. राहुल याला चेतन यानं वयक्तिक अशा ९१ धावांवर बाद करत शतक हुकवलं. आकाश सिंहने मुलाखतीत चेतनला कोणत्या अभिनेत्रीसोबत डेटवर जायची इच्छा असल्याचं विचारलं? तेव्हा गुजरातचा वेगवान गोलंदाजानं अनन्य पांड्याचं नाव घेतलं. सकारिया म्हणाला की, अनन्या पांड्या खूपच सुंदर आहे. तिच्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर कॉफी पिण्याची इच्छा आहे. 

गुरुवारी, राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघासोबत होणार आहे. पहिल्या विजयासाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरले.  
 


​ ​

संबंधित बातम्या