राजस्थानचे 12 वाजवणाऱ्या जड्डूने मैदानातून कुणाला लावला फोन? (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 20 April 2021

बॉलिंगमध्ये चोख भूमिका बजावल्यानंतर फिल्डिंगवेळी त्याने कमाल दाखवली.  

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 12 व्या सामन्यात चेन्नईच्या संघाने दिमाखदार कमबॅक केले. रविंद्र जडेजाने 12 व्या ओव्हरमध्ये घेतलेल्या विकेटमुळे राजस्थान रॉयल्सचे बारा वाजले. हातून निसटत चाललेल्या सामन्यात जडेजाने बटलरला बोल्ड केले. त्यापाठोपाठ शिवम दुबेलाही त्याने तंबूत धाडले. या दोन विकेट मॅचच्या टर्निंग पॉइंट ठरल्या. त्यानंतर मोईन अलीने राजस्थानच्या गड्यांची फिरकी घेतली. बॉलिंगमध्ये कमाल दाखवल्यानंतर बॉल जणू जडेजाचा पाठलाग करत असल्याचा सीन अनुभवायला मिळाला.

बॉलिंगमध्ये चोख भूमिका बजावल्यानंतर फिल्डिंगवेळी त्याने कमाल दाखवली. राजस्थानच्या नऊ विकेट गेल्या त्यातील सहा जण कॅच आउट झाले. यातील चार कॅच जडेजाने घेतले.  जोस बटलरला जडेजाने 49 धावांवर बोल्ड केले. त्याच षटकात शिवम दुबेला त्याने LBW च्या स्वरुपात माघारी धाडले. या दोन विकेटनंतर  जयदेव उनादकटचा चौथा कॅच पकडल्यानंतर जडेजा मैदानातून खास इशारा केला. चौथा कॅच घेतल्याचे सांगत त्याने कुणाला तरी फोन लावावा असे कृत्य केले. यावेळी त्याने ठुमकेही लगावले.  

 


​ ​

संबंधित बातम्या