IPL Auction 2021 : 1097 खेळाडूंनी केली नाव नोंदणी; किती जणांचा नंबर लागणार

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 5 February 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत हंगमातील आयपीएल स्पर्धा ही युएईत रंगली होती. त्यानंतर आता यंदाची आयपीएल स्पर्धा भारतातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

IPL 2021 Auction : आयपीएलच्या मिनी लिलावासाठी नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून तब्बल 1097 खेळाडूंनी लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. आयपीएलच्या 14 व्या हंगामापूर्वी फ्रँचायझी संघांनी रिटेन-रिलीज यादी जाहीर केल्यानंतर लिलावात नाव नोंदणी करण्यासाठी 4 फेब्रुवारीपर्यंतची मुदत होती. 1097 खेळाडूंमध्ये  814 भारतीय खेळाडू असून 283 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे. 

यंदाच्या लिलावात 207 खेळाडू हे राष्ट्रीय संघाकडून प्रतिनिधीत्व केलेले आहेत. तर तब्बल  863 अनकॅप्ड खेळाडू आहेत. असोसिएट्स ग्रुपमधील 27 खेळाडूही आयपीएलच्या लिलावात सहभागी होतील. 
भारतीय कॅप्ड प्लेयर्स - 21
भारतीय कॅप्ड प्लेयर्स - 21 
आंतरराष्ट्रीय कॅप्ड प्लेयर्स -186 
असोसिएट्स - 27 
अनकॅप्ड इंडियन प्लेयर्स जे किमान एक आयपीएल सामना खेळले आहेत - 50 
आयपीलचा किमान एक सामना खेळणारे आंतरराष्ट्रीय अनकॅप्ड प्लेयर्स  -2 
भारतीय अनकॅप्ड प्लेयर्स - 743 
आंतरराष्ट्रीय अनकॅप्ड प्लेयर्स 68 

IPL 2021 : निवृतीनंतरही धोनीचीच हवा; माही ठरला बिग बजेट 'खिलाडी'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत हंगमातील आयपीएल स्पर्धा ही युएईत रंगली होती. त्यानंतर आता यंदाची आयपीएल स्पर्धा भारतातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी हंगामासाठी मजबूत संघ बांधणी करण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील असेल. कोणता खेळाडू कोणत्या संघात जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेल हे ऑस्ट्रेलियन त्रिकूटही आयपीएलच्या लिलावात निश्चितच लक्षवेधी ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या