IPL Auction 2021 : सचिनच्या 'रत्ना'सह 4 सर्वाधिक चर्चेत असणारे चेहरे

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 10 February 2021

जाणून घेऊयात अशा खेळाडूंसंदर्भात जे मिनी आयपीएल लिलावत अनमोल ठरु शकतात, असे चेहरे. 

14 व्या हंगामातील आयपीएल स्पर्धा भारतामध्येच होणार हे स्पष्ट झाले आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या हंगामासाठी चेन्नईत मिनी लिलाव होणार आहे. या लिलाव प्रक्रियेपूर्वी काही युवा खेळाडू चांगलेच चर्चेत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलक शिवाय सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत लक्षवेधी खेळ करणारे तीन खेळाडू चांगलेच चर्चेत आहेत. जाणून घेऊयात अशा खेळाडूंसंदर्भात जे मिनी आयपीएल लिलावत अनमोल ठरु शकतात, असे चेहरे. 

1. अर्जुन तेंडुलकर कोणत्या संघाकडून खेळणार?
May be an image of 1 person and standing
सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुऱ्या हाताने जलदगती गोलंदाजी करणारा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. 20 लाख एवढ्या मूळ किंमतीत त्याची नाव नोंदणी झाली आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसेल, अशी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सशिवाय इतर कोणता संघ त्याला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.  

2. श्रीसंतसाठी आयपीएलचा दरवाजा उघडणार का?
May be an image of 1 person and standing
सात वर्षांच्या वनवासानंतर एस श्रीसंत मुश्ताक अली ट्रॉफीच्या निमित्ताने क्रिकेटच्या मैदानात उतरला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात तो आयपीएलमध्ये खेळणार का? याची प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमामध्येही उत्सुकता आहे. केरळकडून राष्ट्रीय स्पर्धेत उतरलेल्या 37 वर्षीय जलदगती गोलंदाजाने 75 लाख एवढ्या मूळ किंमतीसह नाव नोंदणी झाली आहे.  
3. अझरुद्दीन 
May be an image of one or more people, people standing, people playing sports and text
केरळच्या संघाचा सलामीवीर मोहम्मद अझहरुद्दीन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील कामगिरीनंतर चर्चेचा विषय बनलाय. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने 54 चेंडूत 137 धावा केल्या होत्या. या खेळीमुळे तो भारतातच नाही तर देशभरात चर्चेचा विषय ठरला. सेहवागसह अनेक दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. फ्रँचायझी संघाची या धडाकेबाज खेळाडूवर नजर असेल.   

4. शाहरुखही ठरतोय चर्चेचा विषय 
May be an image of 1 person, playing a sport and text
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तमिळनाडूच्या संघाने सलग दुसरा विजय नोंदवला. संघाच्या विजयात शाहरुख खानने मोलाचा वाटा उचलला. तमिळनाडूचे प्रशिक्षक डी. वासू यांनी शाहरुख मॅच विनर असल्याचे म्हटले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या क्वार्टरफायनलमध्ये त्याने 19 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी करत आयपीएलमध्ये धमाका करण्याची ताकद असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हा खेळाडूही चांगलाच चर्चेत आलाय.  25 वर्षीय खेळाडूला लिलावात चांगली किंमत मिळू शकते.  


​ ​

संबंधित बातम्या