कसोटीतील टी-20 स्टाईलमुळं CSK नं मोईन अलीसाठी मोजले 7 कोटी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 18 February 2021

लिलावाच्या यादीत कोट्यवधींच्या क्लबमध्ये असलेल्या मोईन अलीनं चेन्नई कसोटीत 18 चेंडूत 43 धावा कुटल्या होत्या.  ipl auction 2021 MS Dhoni CSK All rounders Moeen Ali for INR 7 Crore

चेन्नई येथे झालेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या मोईन अलीला लिलावात चांगलाच भाव मिळाला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात आघाडीचे गडी परतल्यानंतर मोईन अलीनं टी-20 स्टाईल फटकेबाजी केली होती.

इंग्लंडच्या संघाकडून दुसऱ्या डावात तुफान फटकेबाजी केल्याचा मोठा फायदाच मोईन अलीला झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली तो चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे.  इंग्लंडच्या ताफ्यातील अष्टपैलू मोईन अलीसाठी चेन्नई सुपर किंग्जने 7 कोटी मोजले आहेत. 

IPL 2021 Auction : मॅक्सवेलसाठी कोहलीच्या संघानं मोजली 'विराट' किंमत

लिलावाच्या यादीत कोट्यवधींच्या क्लबमध्ये असलेल्या मोईन अलीनं चेन्नई कसोटीत 18 चेंडूत 43 धावा कुटल्या होत्या. यात त्याने 5 षटकार आणि 3 चौकार खेचले होते. लिलावापूर्वी चेन्नईच्या मैदानात दाखवलेली फटकाबीजीनंतर त्याला चेन्नईने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. धोनीच्या नेतृत्वाखाली तो आता मैदानात उतरल्याचे दिसेल. 

IPL 2021 Auction : क्रिस मॉरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

चेन्नईच्या पर्समध्ये 22.9 कोटी रुपये आहेत. यातील 7 कोटी त्यांनी परदेशी अष्टपैलूवर लावले. उर्वरित रकमेत ते आणखी कोणाला आपल्या ताफ्यास समाविष्ट करुन घेणार हे पाहण्याजोगे असेल. चेन्नई सुपर किंग्जने अष्टपैलूला संघात घेण्यासाठी सर्वप्रथम मॅक्सवेलवर मोठी बोली लावण्याची उत्सुकता दाखवली. मात्र त्यांनी सरशेवटी मोईन अलीवर 7 कोटी खर्च करुन त्यावरच समाधान मानले. 


​ ​

संबंधित बातम्या