IPL Auction 2021 : IPL च्या ट्विटनं उडाला गोंधळ; अर्जुन तेंडुलकरसंदर्भात मोठा संभ्रम

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 18 February 2021

अर्जुन तेंडुलकरवर कोणता संघ बोली लावणार? अशी चर्चा रंगली होती.

IPL Auction 2021 : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (sachin tendulkar)चा मुलगा अर्जुन तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतून मुंबईच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केलेल्या अर्जुन तेंडुलकरवर कोणता संघ बोली लावणार? अशी चर्चा रंगली होती. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या अर्जुननं  लिलावापूर्वी फलंदाजीची झलकही दाखवली होती. पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील अ गटाकडून खेळताना त्याने 31 चेंडूत 77 धावांची वादळी खेळी केली होती. या सामन्यात त्याने एकाच षटकात 5 षटकार खेचले होते. मुंबई इंडियन्सच त्याला खरेदी करेल अशी चर्चाही रंगली होती. 

IPL auction 2021 : लिलावात 'वीर-झारा'चा झाला; प्रितीच्या गालावर फुलली खळी (VIDEO)

दरम्यान आयपीएलच्या एका ट्विटमुळे अर्जुन तेंडुलकर पुन्हा चर्चेत आला. रॉयल चॅलेंजर्सच्या संगाने सचिन बेबीला 20 लाख या मूळ किंमतीसह खरेदी केले, असे ट्विट  आयपीएलच्या अधिकृत ट्विटवरुन करण्यात आले. 'सचिन बेबी' याचा अर्थ काहींनी अर्जुन तेंडुलकर असा लावला. त्यानंतर सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकरसंदर्भात काही जोक्स व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.  सचिन बेबी हे केरळच्या एका खेळाडूचे नाव आहे. हे ट्विट अर्जुनसंदर्भातील नसून दुसऱ्या एका क्रिकेटरसंदर्भात असल्याचे लक्षात आल्यानंतर या ट्विटच्या आधारावर अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावर ट्विट्स आणि काही पोस्ट करायला सुरुवात केली.

IPL 2021 Auction : क्रिस मॉरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

एका नेटकऱ्याने सचिन बेबी याचा अर्थ सचिन तेंडुलकरचा मुलगा का? असा प्रश्न विचारला.  संभ्रम निर्माण करणाऱ्या ट्विटनंतर एका नेटकऱ्यांने हा सचिनचा मुलगा नसून केरळमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणारा सचिन बेबी नावाचा खेळाडू असल्याचे ट्विट केले. डावखुरा फलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करतो, असा उल्लेखही या नेटकऱ्याने केल्याचे पाहायला मिळाले.  
आयपीएल ट्विटर हँडेल करण्यासाठी बसवण्यात आलेला व्यक्ती मूर्ख आहे.  सचिन बेबीऐवजी अर्जुन लिहायला काय होत होते, अशी भावनाही व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने या सर्व प्रकारावर कूल ट्विट केले आहे. रिलॅक्स व्हा हा सचिन बेबी आहे तो सचिनचा बेबी नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान आयपीएलच्या लिलावातील  सर्वात शेवटी अर्जुन तेंडुलकरच नाव आले. अपेक्षप्रमाणे मुंबई इंडियन्स संघाने त्याला 20 लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. 
 


​ ​

संबंधित बातम्या