IPL Auction 2021: सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर MI कडून खेळणार? जाणून घ्या बेस प्राइज

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 February 2021

मिनी लिलावात मुंबई इंडियन्सकडूनच त्याच्यावर बोली लागेल असा अंदाज आहे.

IPL Auction 2021:  विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर 18 फेब्रुवारीला चेन्नईत होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी असणार आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या माध्यमातून  मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केल्यानंतर आयपीएलमध्ये तो कोणत्या संघाकडून खेळणार याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. युएईच्या हंगामात अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यासोबत दिसला होता. नेट बॉलर म्हणून तो संघासोबत होता. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स त्याला आपल्या ताफ्यात समावेश करुन घेऊ शकते. 

IPL 2021 : निवृतीनंतरही धोनीचीच हवा; माही ठरला बिग बजेट 'खिलाडी'

डावखुऱ्या हाताने जलदगती गोलंदाजी करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइज (मूळ किंमत) 20 लाख इतकी आहे. मिनी लिलावात मुंबई इंडियन्सकडूनच त्याच्यावर बोली लागेल असा अंदाज आहे. पण त्याच्यासाठी मुंबई इंडियन्स किती रुपये मोजणार हे पाहणे लक्षवेधी ठरेल. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे सात वर्षे क्रिकेटपासून दूर असलेल्या श्रीसंतची बेस प्राइज 75 लाख इतकी आहे. त्याने तब्बल 7 वर्षानंतर सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतून कमबॅक केले होते. 

स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या श्रीसंतला 75 लाख मिळणार की...

आयपीएल 2021 चा मिनी लिलावात एकूण 1097 खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे.  यात 814 भारतीय खेळाडूंसह 283 परदेशी खिळाडूंचा समावेश  आहे. या लिलावात सर्वाधिक नोंदणी केलेल्या परदेशी खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा आकडा मोठा आहे. 56 कॅरेबियन खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे. ऑस्ट्रेलियातील 42 दक्षिण अफ्रीकेचे 38, श्रीलंकेचे 31, न्यूजीलंडचे 29, इंग्लंडचे 21,यूएई  9, नेपाळचे 8, स्कॉटलंडचे 7, बांग्लादेश 5 आणि आयर्लंड, झिम्बाब्वे, यूएसए आणि नँदरलंडच्या प्रत्येकी दोन-दोन खेळाडूंचा समावेश आहे. 


​ ​

संबंधित बातम्या