IPL Auction 2021 : अनसोल्ड राहिल्यावर गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; ICCने केली मध्यस्थी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

याच अर्थाने कदाचित यष्टीरक्षक बॅट्समनने आपल्या गर्लफ्रेंडच्या खांद्यावरुन गोळी मारण्याचा प्रकारही त्याने केलेला असू शकतो.

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) मिनी लिलावातीला पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिलेल्या इंग्लंडच्या यष्टिरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग ( Sam Billings) ची त्याच्या गर्लफ्रेंडनंच चांगलीच फिरकी घेतली. देशांतर्गत स्पर्धेत तुफान फटकेबाजीच्या शैलीनं ओळखल्या जाणाऱ्या सॅम बिलंगची मूळ किंमत 2 कोटी इतकी होती. पहिल्या टप्प्यात फ्रँचायझी संघाने अष्टपैलू खेळाडूंना मोठी बोली लावण्यास पसंती दिली. त्यामुळे त्याला संघात सामील करुन घेण्यास कोणत्याही संघाने उत्सुकता दाखवली नाही.

अनसोल्ड राहिल्यावर गर्लफ्रेंडनं ट्रोल केल्याचे ट्विट खुद्द बिलिंगने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन केले आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय की, मी अनसोल्ड राहिल्यानंतर माझी  गर्लफ्रेंण्ड साराह हिने मला बॉलर का झाला नाहीस? असा प्रश्न विचारला. त्याच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

IPL Auction 2021 : अनेक दिग्गजांच्या पदरी निराशा; जाणून घ्या अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी

मिनी लिलावात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिस याच्यासाठी विक्रमी बोली लागली. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जाये रिचर्डसन याने भारतीय मैदानात एकही सामना खेळला नसताना पंजाब किंग्जने त्याच्यासाठी 14 कोटी मोजल्याचे पाहायला मिळाले. मॅक्सवेलही महागडा खेळाडू ठरला. लिलावात अष्टपैलूला अधिक महत्त्व असल्याचे दिसून आले. याच अर्थाने कदाचित यष्टीरक्षक बॅट्समनने आपल्या गर्लफ्रेंडच्या खांद्यावरुन गोळी मारण्याचा प्रकारही त्याने केलेला असू शकतो.

यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आयसीसीने दोघांत तिसरा सगळे विसरा, असा तोरा आयसीसीने दाखवला. आयसीसीच्या ट्विटर अकाउंटवरुन बिलिंगच्या ट्विटवर प्रतिक्रिया देण्यात आलीय. आसीसीने बिलिंगचे बॉलिंग रेकॉर्ड शेअर केले आहे. यात बिलिंगने फर्स्ट क्लासमध्ये केवळ एक चेंडू टाकला आहे. यावरही त्याला चौकार पडला आहे. पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिला असला तरी दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले.  मात्र त्याने केलेले ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.


​ ​

संबंधित बातम्या