सोशल मीडियावर रंगली सारा तेंडुलकरच्या 'त्या' पोस्टची चर्चा

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

अर्जुन तेंडुलकर मागील दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्ससंघासोबत नेट बॉलर म्हणून होता.

IPL Auction 2021 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा  (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ट्रेंड होत असताना आता यात सारा तेंडुलकरचाही समावेश झालाय. सारा तेंडुलकरची इन्स्टा स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चेन्नईत पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला. 

मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर याच संघासोबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मेंटरच्या भूमिकेत दिसतो. आता त्याचा मुलगा या टीमसोबत अधिकृतरित्या जॉइन झाला आहे. अर्जुन तेंडुलकर मागील दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्ससंघासोबत नेट बॉलर म्हणून होता. अधिकृतरित्या गुरुवारी तो मुंबई इंडियन्सचा सदस्य झाला. त्या मुंबई इंडियन्सने 2 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केले. मुंबई इंडियन्स संघाचे मालक, स्टाफ सदस्य यांच्याकडून वेगेवळ्या प्रतिक्रिया उमटत असताना साराच्या इन्स्टा स्टोरीनं सर्वांच लक्ष्य वेधून घेतल आहे.

IPL Auction 2021 : अनसोल्ड राहिल्यावर गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; ICCने केली मध्यस्थी

No photo description available.

आपल्या छोट्या भावाची मुंबई इंडियन्सच्या संघात वर्णी लागल्यावर तिने अर्जुनसोबतचा एक क्युट फोटो आपल्या इन्स्टा स्टोरीवरुन शेअर केला. ही स्टोरी शेअर करतान तिने हा क्षण अभिमानास्पद आहे. असा उल्लेखही केला होता. भावाच्या सिलेक्शननंतर तिने व्यक्त केलेल्या आनंदाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगताना दिसते आहे. साराने भावाचे अभिनंदन करताना लिहलं होतं की, अभिनंदन! या यशापासून तुला कोणीही दूर घेऊन जाऊ शकत नाही. हे यश तुझं आहे. मला तुझा अभिमान वाटतो. 

IPL Auction 2021 : अनेक दिग्गजांच्या पदरी निराशा; जाणून घ्या अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी

21 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने आयपीएल लिलावापूर्वी मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तो हरियाणाविरुद्धच्या सामन्यात पहिला राष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता. मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून आतापर्यंत खेळलेल्या 2  टी-20 सामन्यात  3 धावा आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या