स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या श्रीसंतला 75 लाख मिळणार की...

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 5 February 2021

लिलावामध्ये खेळाडूंवर बोली लावण्यासाठी सर्वाधिक रक्कम ज्यांच्या खात्यात आहे त्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आघाडीवर आहे.

चेन्नईत होणाऱ्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी होणाऱ्या मिनी लिलावासाठी 1097 खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती आणि घातक गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावाचा समावेश नसल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे स्पॉट फिक्सिंगमुळे अडचणीत आलेल्या श्रीसंतने नाव नोंदणी केली असून त्याची मूळ किंमत 75 लाख इतकी नोंदवण्यात आल्याचे समजते. 

आजीवन बंदीच्या कारवाईतून सुटका झाल्यानंतर तब्बल सात वर्षानंतर श्रीसंत सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या माध्यमातून पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला होता. केरळकडून खेळताना श्रीसंतने 4 विकेट घेतल्या होत्या. त्याला आयपीएलमध्ये कोणता संघ खरेदी करणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. देशांतर्गत क्रिकेटमध्येच नाही तर देशाकडून पुन्हा मैदानात उतरण्याचे स्वप्न श्रीसंतने यापूर्वी बोलून दाखवले होते.  खेळाडूंना रिटेन आणि रिलीज केल्यानंतर 61 खेळाडूंवर मिनी आयपीएलमध्ये बोली लागणार आहे. यात 22 परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. त्यामुळे श्रीसंतला कोणता संघ पसंती देणार हे पाहणेही उत्सुकतेचे असेल. 

IPL 2021 : निवृतीनंतरही धोनीचीच हवा; माही ठरला बिग बजेट 'खिलाडी'

लिलावामध्ये खेळाडूंवर बोली लावण्यासाठी सर्वाधिक रक्कम ज्यांच्या खात्यात आहे त्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आघाडीवर आहे. त्यांच्या खात्यात 53.20 कोटी रुपये शिल्लक आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खात्यात 35.90 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 34.85 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज 22.90 कोटी, मुंबई इंडियन्स 15.35 कोटी, दिल्ली कॅपिटल्स 12.9 कोटी तर कोलकाता नाईट रायडर्सकडे 10.75 कोटी शिल्लक आहेत. 

ऑस्ट्रेलियाच्या 42 तर इंग्लंडच्या 21 खेळाडूंनी नाव नोंदणी केली असून मिशेल स्टार्कसह इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट आयपीएल लिलावात सहभागी झालेले नाहीत.  


​ ​

संबंधित बातम्या