IPL auction 2021 : लिलावात 'वीर-झारा'चा झाला; प्रितीच्या गालावर फुलली खळी (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 18 February 2021

यंदाच्या आयपीएलच्या लिलावात शाहरुखची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय क्रिकेटच्या मैदानातील लोकप्रिय स्पर्धा असलेल्या आयपीएल (IPL 2021) च्या आगामी हंगामासाठी चेन्नईमध्ये मिनी लिलाव सुरु आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान या दोघांच्या टीम आयपीएलच्या मैदानात एकमेकांविरोधात लढताना आपण पाहिले आहे. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. तसेच ही सेलिब्रिटी मंडळी मॅच दरम्यान एकमेकांसोबतही दिसले आहेत. 

यंदाच्या आयपीएलच्या लिलावात शाहरुखची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान नव्हे तर तमिळनाडूकडून खेळणाऱ्या शाहरुख खानची आयपीएलच्या लिलावादरम्यान चर्चेत आहे. 20 लाख मूळ किंमत असलेल्या शाहरुख खानला प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्जने 5.25 लाख रुपये मोजून खरेदी केले. 

IPL 2021 Auction : क्रिस मॉरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

शाहरुख खानला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतल्यानंतर प्रितीच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जाणारे असेच होते. पंजाब किंग्जच्या ट्विटर अकाउंटवरुन  प्रिती झिंटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रिती झिंटा चांगलीच खूश झाल्याचे दिसते. शाहरुख आपल्या बाजून आला, असेच काहीसे ती म्हणताना पाहायला मिळते. सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या