IPL Record : तुम्हाला पटणार नाही; MI विरुद्ध बेस्ट बॉलिंग फिगरमध्ये रोहितचाही समावेश

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 13 April 2021

सुरुवातीच्या काही हंगामात रोहित शर्मा हा डेक्कन चार्जस हैदराबादच्या ताफ्यातून खेळत होता. यावेळी तो बॉलिंगही करायच्या. डेक्कन चार्जस (सध्याचा संघ सनरायझर्स हैदराबाद) कडून खेळताना रोहित शर्माच्या नावे हॅटट्रिकचीही नोंद आहे. 

IPL Record : आंद्रे रसेल याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात खास रेकॉर्ड आपल्या नावे केले. पाचवेळच्या चॅम्पियन्स संघातील निम्मा संघ माघारी धाडणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या हर्षल पटेलनं मुंबईचा निम्मा संघ गारद केला होता. 13 वर्षानंतर मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ तंबूत धाडण्याचा पराक्रम हर्षलने करुन दाखला. पहिल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स दिमाखदार पदार्पण करेल, अशी आशा असताना कोलकाता नाईट रायडर्ससमोर तगडी बॅटिंग लाईन असलेला मुंबई इंडियन्सचा संघ अवघ्या 158 धावांत आटोपला. आघाडीचे फलंदाज परतल्यानंतर रसेलने तळाच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने अवघ्या दोन षटकात 5 विकेट घेतल्या.

मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वोत्तम बॉलिंग फिगरच्या यादीत रोहित शर्माच्या नावाचाही समावेश आहे. तुम्हाला कदाचित हे आश्चर्य वाटेल. पण 2009 च्या हंगामात रोहितने मुंबई विरुद्ध बेस्ट बॉलिंग फिगरची नोंद आपल्या नावे केली होती. सुरुवातीच्या काही हंगामात रोहित शर्मा हा डेक्कन चार्जस हैदराबादच्या ताफ्यातून खेळत होता. यावेळी तो बॉलिंगही करायच्या. डेक्कन चार्जस (सध्याचा संघ सनरायझर्स हैदराबाद) कडून खेळताना रोहित शर्माच्या नावे हॅटट्रिकचीही नोंद आहे. 

संजूचं शतक व्यर्थ, राजस्थानचा ४ धावांनी पराभव

2009 मध्ये भारतातील निवडणुकींमुळे आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने हे दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात खेळवण्यात आले होते. या हंगामात 6 मे 2009 रोजी सेंच्युरीयनच्या मैदानात रोहित शर्माने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात लक्षवेधी गोलंदाजी केली होती. त्याने 2 षटकात 6 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या होत्या. रोहितची ही आयपीएलमधील सर्वोकृष्ट बॉलिंग फिगर आहे. एवढेत नाही तर मुंबई इंडियन्सविरुद्ध उत्तम बॉलिंग फिगरच्या यादीत हर्षल पटेल, आंद्रे रसेल यांच्यानंतर त्याच्या नावाचा समावेश होता. सध्याच्या घडीला रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने विक्रमी पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.    

Best figures vs MI: आंद्रे रसेल 5/15 चेन्नई 2021 # हर्षल पटेल  5/27 चेन्नई 2021 #रोहित शर्मा 4/6 सेंच्युरियन 2009


​ ​

संबंधित बातम्या