कोरोना वाढत असताना आयपीएल स्टार नशीबवान!

पीटीआय
Saturday, 24 April 2021

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे; पण त्यानंतरही भारतातील स्टार क्रिकेटपटू आयपीएल खेळत आहेत. ते नशीबवान असल्यामुळेच त्यांना ही संधी लाभत आहे, असे इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्स याने सांगितले. 

नवी दिल्ली - भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे; पण त्यानंतरही भारतातील स्टार क्रिकेटपटू आयपीएल खेळत आहेत. ते नशीबवान असल्यामुळेच त्यांना ही संधी लाभत आहे, असे इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्स याने सांगितले. 

आयपीएलमध्ये चार खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली, तर काही खेळाडूंनी स्पर्धेचा निरोप घेतला आहे. देशात रोज तीन लाखाच्या आसपास कोरोनाबाधित आढळत असताना यापासून सुरक्षित वातावरणात आयपीएल सुरू आहे. प्रेक्षकांविना सहा शहरांत होत असलेली ही लीग भारतातच होणाऱ्या विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धेची रंगीत तालीम मानली जात आहे. 

जैवसुरक्षित वातावरणात अधिकाधिक सकारात्मक राहण्याचा आम्हा खेळाडूंचा प्रयत्न आहे. जगभरात सर्व जण कोरोनाचा सामना करीत आहेत; पण आम्ही खेळाडू नशीबवान आहोत. आम्हाला खेळण्याची संधी लाभत आहे. आम्ही चाहत्यांचे मनोरंजनही करीत आहोत, असे वोक्स म्हणाला. यंदाची ही लीग वेगळीच आहे. चाहत्यांविना लीग होत आहे. जैवसुरक्षित वातावरणाचा अनुभवही मिळत आहे, असेही तो म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या