IPL 2021: जडेजाच्या नो बॉलवरील बटलरच्या सिक्सरमुळे राजस्थान हरले; जाणून घ्या फॅक्ट

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 20 April 2021

बटलरने आक्रमक खेळीने राजस्थान रॉयल्सला मॅचमध्ये आणले. मग त्याच्या षटकारामुळे राजस्थानचा संघ अडचणीत कसा आला?

एमएस धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएलच्या बाराव्या सामन्यात राजस्‍थान रॉयल्‍सला 45 धावांनी पराभूत केले. पहिल्यांदा बॅटिंग करताना चेन्नई सुपर किंग्जने  9 विकेट गमावून 188 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना संजू सॅमसनच्या (Sanju Samsan) नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ 9 बाद 143 धावांपर्यंत मजल मारु शकला. सुरुवातीच्या काही षटकात चेन्नई आणि राजस्थान यांच्यात 'कांटे की टक्कर' होताना दिसली, 5.4 ओव्हरमध्ये चेन्‍नईने 2 विकेट गमावून 45 धावा केल्या. राजस्थानच्या संघाने  5.5 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 45 धावा केल्या होत्या. रविंद्र जडेजाच्या नो बॉलवर जोस बटलरने मारलेला सिक्सर राजस्थान रॉयल्सचाठी घातक ठरला. 

बटलरने आक्रमक खेळीने राजस्थान रॉयल्सला मॅचमध्ये आणले. मग त्याच्या षटकारामुळे राजस्थानचा संघ अडचणीत कसा आला? असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडला असेल. त्याने लगावलेल्या षटकारानंतर मॅच चेन्नईच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झाली. राजस्थान रॉयल्सच्या धावफलकाव 87 धावा असताना बटलरच्या विकेटने याची सुरुवात झाली. बघता बघता राजस्थान रॉयल्सने 95 धावांवर सात विकेट गमावल्या.  

राजस्थानचे 12 वाजवणाऱ्या जड्डूने मैदानातून कुणाला लावला फोन? (VIDEO)​

चेंडू बदलला आणि फिरकींनी बॅट्समनची घेतली गिरकी 

10 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर जोस बटलरने  रविंद्र जडेजाला उत्तुंग षटकार मारला. मिडविकेटवरुन मारलेला फटका स्टँडमध्ये जाऊन पडला. बॉल स्टँडमध्ये पडल्यामुळे तो बदलण्यात आला. ओल्या चेंडूएवजी सुका चेंडू गोलंदाजांच्या हाती आला. आणि चेन्नईच्या गोलंदाजांना फिरकीतील जादू दाखवून दिली.  नो बॉलवर सिक्सर मारल्यानंतर बटलरला जडेजाने चकवा देत बोल्ड केले. त्याने 35 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने  49 धावा केल्या. याच ओव्हरमध्ये जडेजाने शिवम दुबेला  (17) धावांवर  एलबीडब्‍ल्‍यू केले. त्यानंतर मोईन अलीने आपल्या फिरकीतील जादू दाखवली. त्याने 7 धावांत 3 विकेट घेतल्या.  


​ ​

संबंधित बातम्या