IPL 2021 : बायो-बलची धास्ती; दोघांनी आयत्यावेळी घेतली IPL मधून माघार

सकाळ स्पोर्ट्स टीम
Thursday, 1 April 2021

बायोबबलची कल्पना खेळाडूंना आधीपासूनच होती. अखेरच्या टप्प्यात बायोबबलच कारण देऊन माघार घेण्याचा निर्णय अयोग्य वाटतो, असे मत आकाश चोप्रांनी मांडले आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील सर्व सामने भारतात रंगणार आहे. स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली असताना मिचेल मार्श आणि जोश हेजलवूड यांनी स्पर्धेतून माघार घेतलीय. बराच काळ कोरोना प्रोटोकॉलमध्ये वावरण्यात असमर्थ असल्याचे सांगत या दोन्ही ऑस्ट्रेलियन क्रिकटर्संनी स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खेळाडूंना ऐन टायमाला घेतलेल्या निर्णयावर भारताचे माजी क्रिकेटर्स आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. बायोबबलची कल्पना खेळाडूंना आधीपासूनच होती. अखेरच्या टप्प्यात बायोबबलच कारण देऊन माघार घेण्याचा निर्णय अयोग्य वाटतो, असे मत आकाश चोप्रांनी मांडले आहे.   

आकाश चोप्रा यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिलंय की, 'बायो-बबल खेळाडूंवर परिणामकारक आहे. या वातावरणात खेळाडूंना त्रास होत आहे. पण या गोष्टी खेळाडूंना आधीच माहित आहेत. स्पर्धा अवघ्या 10 दिवसांवर असताना माघार घेऊन या खेळाडूंनी फ्रेंचायजी संघाला अडचणीत आणले आहे, असा उल्लेख आकाश चोप्रांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. हेजलवूडने 'क्रिकेट डॉट कॉम एयू'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयपीएलमधून माघार घेतल्याचे स्पष्ट केले होते. मागील 10 महिन्यांपासून वेगवेगळ्या काळात बायो-बबल आणि क्वांरटाईनचा अनुभव घेतला. यासर्व वातावरणात राहिल्यानंतर आता क्रिकेटपासून थोडा ब्रेक घेऊन ऑस्ट्रेलियात कुटुंबियांसोबत काही वेळ घालवण्याला प्राधान्य देणार आहे. वेस्ट इंडिज दौरा आणि विंटर सीझनच्या दृष्टीने क्रिकेटमधून ब्रेक घेणे गरजेचे होते, असेही हेजलवूडने म्हटले आहे.

फलंदाजांना टार्गेट माहित नव्हतं ही अफवाच; जाणून घ्या गोंधळामागचे नेमकं कारण

हेजलवूडपूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या संघातील मिचेल मार्शने कोरोनाच्या प्रोटोकॉलला कंटाळून आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. हैदराबादच्या संघाने त्याच्या जागी जेसन रॉयला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.  जेसन रॉय यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या