IPL 2021 : गोव्याची टूर नडली; KKR च्या राणाला कोरोना

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 1 April 2021

दोन दिवसांपूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाली असून ही बातमी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे टेन्शन वाढवणारी आहे. 

आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी स्पर्धेत सहभागी असलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज नितीश राणा याचा कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार राणा हा काही दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याला गेला होता. दोन दिवसांपूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाली असून ही बातमी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे टेन्शन वाढवणारी आहे. 

कोलकाता नाईट रायडर्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच राणाचा कोरोना रिपोर्ट आला असून त्याला कोरोनाची लागण झाली आहे. नितीश राणाने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत दमदार कामगिरी नोंदवली होती.  दिल्लीकडून 7 सामने खेळणाऱ्या राणाने 1 शतक आणि 1 अर्धशतकाच्या जोरावर 398 धावा केल्या होत्या. 

IPL 2021 : मुंबई इंडियन्सला फिरकीची उणीव

आयपीएलच्या 14 व्या हंगामाचा शुभारंभ 9 एप्रिल रोजी होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आपला पहिला सामना 11 तारखेला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. नितीश राणा सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. नितिश राणाने मागील हंगामात फाल लक्षवेधी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. मात्र काही सामन्यात त्याने संघासाठी उपयुक्त खेळी केली होती. एकंदरीत आयपीएलचा विचार केल्यास 60 सामन्यात त्याने 28 च्या सरासरीने  1437 धावा केल्या आहेत. त्याचे स्टाईक रेट 135.56 इतके आहे. 


​ ​

संबंधित बातम्या