धोनीनं पुन्हा बदलला लूक: चाहत्यांकडून लाईक्सची बरसात तर होणारच!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 25 January 2021

आगामी आयपीएलसाठी पुन्हा मैदानात उतरण्यापूर्वी धोनीच्या नव्या आणि हटके अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आपल्या नव्या -नव्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएल मैदानात तो उतरल्याचे पाहायला मिळाले. आयपीएल स्पर्धेतील हटके लूकनंतर आता धोनीच्या नव्या लूकची चर्चा जोरदार रंगताना दिसते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून  जरी धोनीने निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. त्याला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी धोनीच चाहते आगामी आयपीएल स्पर्धेची निश्चितीच उत्सुकतेने वाट पाहत असतील. 

आगामी आयपीएलसाठी पुन्हा मैदानात उतरण्यापूर्वी धोनीच्या नव्या आणि हटके अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  धोनी एका जाहिरातीलसाठी मुंबईमध्ये असल्याचे समजते. नव्या अवतारात धोनी नव्या हेअर स्टाईलसह सूटमध्ये दिसतोय. हा त्याचा जाहिरातीपुरता लूक आहे की याच अंदाजात तो मैदानात उतरेल, याचा अंदाज बांधणे कठिण आहे. पण तूर्तास त्याच्या या लूक चाहत्यांना चांगलाच भावताना दिसतोय.  

अबतक 606 विकेट! जिमी करतोय जम्बोच्या विक्रमाचा पाठलाग

15 ऑगस्ट 2020 मध्ये महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसला. आगामी आयपीएलमध्ये देखील चेन्नईची धूरा त्याच्याकडेच असणार आहे. आयपीएलसाठी मैदानात उतरेपर्यंत तो आणखी काही नव्या लूकमध्ये दिसला तरी त्याचे नवल वाटणार नाही. पण त्याची स्टाईलही लोकप्रिय होणार हे मात्र निश्चित.


​ ​

संबंधित बातम्या