आता तरी सुधरा रे! लिलावात भाव न मिळालेल्या संवगड्यांचे जयवर्धनेनं टोचले कान

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील लसिथ मलिंगा याने मिनी आयपीएलपूर्वी व्यावसायिक क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतला होता.

 IPL Auction 2021 :  मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि श्रीलंकेचे माजी क्रिकेटर महेला जयवर्धने यांनी आयपीएलच्या मिनी लिलावानंतर मोठे विधान केले आहे. चेन्नईमध्ये झालेल्या लिलावात श्रीलंकेच्या एकाही खेळाडूवर बोली लागली नाही. हाच धागा पकडून त्यांनी आपल्या देशातील खेळाडूंनी खेळाचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचा टोला लगावला. आयपीएलच्या लिलावात एकाही श्रीलंकन खेळाडूला बोली लागली नाही. हा लंकेतील सर्व खेळाडूंसाठी एक मोठा संदेशच आहे. खेळाडूंना आपल्या खेळामध्ये बदल करुन दर्जा सुधारावा लागेल, असे ते म्हणाले. 

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील लसिथ मलिंगा याने मिनी आयपीएलपूर्वी व्यावसायिक क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्याने यासंदर्भातील माहिती मुंबई इंडियन्सला दिल्यानंतर मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वीच त्याला रिलीज केल्याची घोषणा केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इसुरु उडाना याला रिलीज केले. यंदाच्या आयपीएलमध्ये एकही श्रीलंकन खेळाडू खेळणार नाही.  उडाना, कुशल परेरा आणि थिसारा परेरा याचा लिलावात समावेश होता. मात्र त्यांच्यावर एकाही फ्रँचायझी संघाने बोली लावली नाही.

INDvsENG : विराटनंही केलाय डिप्रेशनचा सामना; एकटेपणाचा अनुभव खूप वाईट होता

जयवर्धने यांनी स्पोर्ट्स वेबसाईला दिलेल्या मुलाखतीवेळी श्रीलंकन खेळाडूंनी खेळ सुधारण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आमच्याकडे अजूनही प्रतिनिधीत्व आहे. (संगकारा आणि महेला जयवर्धने आयपीएलच्या संघाशी जोडले गेले आहेत.) लिलावात श्रीलंकन खेळाडूंवर बोली न लागल्याने निराश आहे. मिनी लिलावात त्यांना एखाद्या संघात जागा मिळवणे खुपच कठीण होते. परदेशी खेळाडूंसाठी केवळ 20 स्लॉट होते.

IPL Auction 2021 : अनसोल्ड राहिल्यावर गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; ICCने केली मध्यस्थी

त्यात जलदगती गोलंदाज आणि अष्टपैलूंना पसंती मिळाली. श्रीलंकन खेळाडूंमध्ये याची उणीव आहे. त्यामुळे श्रीलंकेचा एकही खेळाडू खेळताना दिसणार नाही, असेही ते म्हणले. आयपीएलच्या लिलावातून खेळाडूंना मोठा संदेश मिळाला आहे. यापुढे यांनी ज्या गोष्टीत कमी आहेत, त्यावर फोकस करायला हवे, असा सल्लाही त्यांनी आपल्या सवंगड्यांना दिला.  


​ ​

संबंधित बातम्या