मुंबईच्या विजयानंतर शाहरुख खान म्हणाला...

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 April 2021

अखेरच्या क्षणी मुंबईनं बाजी पलटवत कोलकाता संघाचा पराभव केला.

चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अखेरच्या क्षणी मुंबईनं बाजी पलटवत कोलकाता संघाचा पराभव केला. ३० चेंडूत ३१ धावांची गरज आणि हातात विकेट शिल्लक असताना कोलकाताचा संघ १० धावांनी पराभूत झाला. या पराभवानंतर कोलकाता संघाच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. चाहत्यांचा राग अनावर गेला असताना संघ मालक शाहरुख खान यानं ट्विट करत चाहत्यांची माफी मागितली आहे. शाहरुख खान याचं हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. 

मुंबईने दिलेल्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघानं आश्वासक सुरुवात केली होती. नितीश राणा आणि शुबमन गिल यांनी तडाखेबाज सुरुवात करत विजय दृष्टीक्षेपात आणला होता. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र मधली फळी ढेपाळल्याने मुंबईने १० धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर  कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. या पराभवानंतर कोलकाता संघाचा मालक असलेल्या शाहरुख खानने ट्विट करून चाहत्यांची माफी मागितली.

सामना संपल्यानंतर संघाचा मालक शाहरुख खान याने ट्विट करत म्हटले, ‘ या सामन्याबद्दल कमी शब्दात म्हणायचं तर निराशाजनक कामगिरी. कोलकाता नाईट रायडर्सच्या सर्व चाहत्यांची माफी.’

 प्रथम फलंदाजी करताना सुर्यकुमार यादव 56(36) आणि रोहित शर्मा 43 (32) मुंबई इंडियन्स यांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 152 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने दमदार सुरुवात केली. नितीश राणा 57 (43) आणि शुभमन गिल 33 (24) यांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. राहुल चाहरने सेट झालेल्या या दोघांसह राहुल त्रिपाठी 5 (5), इयॉन मॉर्गन 7 (7) धावांवर माघारी धाडले. अखेरच्या षटकात बुमराहने अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी आणि शेवटच्या षटकात ट्रेंड बोल्डने कोलकाता नाईट रायडर्सला दिलेले धक्के याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाताच्या संघाला 10 धावांनी पराभूत केले. 
 


​ ​

संबंधित बातम्या