Video : कॅप्टन कूलच्या हस्ते CSKची नवी जर्सी लाँच; आर्मीचाही सन्मान

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 29 March 2021

धोनीसह चेन्नईच्या संघाचे आर्मीवरील प्रेम यापूर्वीही दिसून आले आहे. 2019 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने भारतीय लष्कराला मोठी आर्थिक मदत केली होती.

चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) चा कर्णधार  एमएस धोनीने (MS Dhoni) आगामी आयपीएल 2021 (IPL 2021) च्या हंगामासाठी संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण केले. नव्या जर्सीच्या माध्यमातून आर्मीचा सन्मान केल्यामुळे चाहते चेन्नई संघावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसते. कॅप्टन कूल धोनी आपल्या फ्रेंचायझी संघाची जर्सी लॉन्च करताना तमिळ भाषेत बोलल्याचे पाहायला मिळते.  चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.  

नव्या जर्सीच्या माध्यमातून सीएसकेने इंडियन आर्मी (Indian Army) चा सन्मान केला आहे. जर्सीच्या शोल्डरवर आर्मीचा 'कॅमॉफ्लॉज' दिसून येतो. फ्रेंजायजीने हटके अंदाजात आर्मीला सलाम करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळते.  2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईचा संघ आयपीएल स्पर्धेत चॅम्पियन ठरला होता. याची आठवण जर्सीवरील फ्रेंचायझीच्या लोगोच्यावर असलेल्या 3 स्टारमधून होते.  

...म्हणून कृणाल पांड्या ड्रेसिंग रुममध्ये घेऊन आला होता वडिलांची कपडे

चेन्नई सुपर किंग्जचे कार्यकारी अध्यक्ष एस विश्वनाथ यांनी जर्सीवर आर्मीला दिलेल्या सन्मानबद्दल म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून सशस्त्र सेना दलाच्या निस्वार्थ सेवेच्या जनजागृतीसाठी काही तरी करण्याचा विचार सुरु होता. कॅमॉप्लऑज याचा विचारातून जर्सावर आणले आहे. देशाच्या संरक्षणासाठी सर्वात पुढे असणारे जवान खरे हिरो आहेत, असा उल्लेखही विश्वनाथ यांनी केलाय.  

धोनीसह चेन्नईच्या संघाचे आर्मीवरील प्रेम यापूर्वीही दिसून आले आहे. 2019 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने भारतीय लष्कराला मोठी आर्थिक मदत केली होती. यावेळी चेन्नईने तब्बल 2 कोटी रुपयांचा चेक दिला होता. भारतीय संघाला आयसीसीच्या सर्व ट्रॉफ्या जिंकून देणारा भारतीय संघाचा माजी सेनापती आणि चेन्नई विद्यमान कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारतीय लष्करातील पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. त्याला मानद लेफ्टनंट कर्नलपद बहाल करण्यात आले आहे.  वर्ल्ड कपनंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिलेल्या धोनीने  जम्मू आणि काश्मिरमध्ये गस्त घालण्याचे काम केल्याचीही चांगलीच चर्चा रंगली होती. 


​ ​

संबंधित बातम्या