पराभवामुळे व्यथित पण पुनरागमन करू; मुंबई फलंदाज सूर्यकुमार यादवचा विश्वास

सुनंदन लेले
Sunday, 25 April 2021

गेल्या काही सामन्यांत आम्ही फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केलेली नाही हे मान्य करतो. पराभवाने सगळेच व्यथित झाले आहेत. चेन्नईमधील खेळपट्ट्या वेगळ्या होत्या. खेळपट्टीवर फटके मारणे कधी कधी फार कठीण होऊन बसले, कारण चेंडू बॅटवर येतच नव्हता.

गेल्या काही सामन्यांत आम्ही फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केलेली नाही हे मान्य करतो. पराभवाने सगळेच व्यथित झाले आहेत. चेन्नईमधील खेळपट्ट्या वेगळ्या होत्या. खेळपट्टीवर फटके मारणे कधी कधी फार कठीण होऊन बसले, कारण चेंडू बॅटवर येतच नव्हता. दरवेळी वेगळ्या वेगाने चेंडू येत राहिल्याने फलंदाजी करताना अंदाज चुकत होता. मुंबई इंडियन्स संघाकरता थोडी पीछेहाट होणे नवीन नाही, पण दरवेळी आम्ही मेहनत करून जोरदार पुनरागमन केले आहे. या वेळी तसे होईल याची खात्री आहे, असा विश्वास मुंबईचा भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने व्यक्त केला.

फक्त एका सामन्यात सगळ्या गोष्टी जमून यायला हव्यात, मग आमचा संघ आणि खेळाडू मागे वळून बघणार नाहीत. चेन्नईतील सामन्याचा एक टप्पा पार पडलाय. आता सगळेच नवीन टप्प्याची वाट बघत आहेत. मी इतकेच सांगतो, की सगळेच सरावात खूप कष्ट करत आहेत. मला खात्री आहे आम्हाला यश नक्की मिळेल, असेही सूर्यकुमार म्हणाला.

विजय वळण देईल : राहुल
एका सामन्यातील विजयाने आम्ही शेफारून जाणार नाही. गतवर्षी सुरुवात खराब झाल्यावर असेच नवे चैतन्य पंजाब संघाला जाणवले होते. मुंबईविरुद्धचा विजय संघाला नवे वळण देईल. आमच्या संघात नव्या आणि तरुण खेळाडूंना आम्ही दाखल करतो. त्याने संघ एकत्रित काम करायला कधी कधी थोडा वेळ लागतो. आमचे प्रशिक्षकांचा ताफा आणि संघ मालक संयम ठेवतात आणि आमच्यावर विश्वास ठेवतात हे महत्त्वाचे आहे, असे पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलने सांगितले.

दीपक हुडा आणि शाहरूख हे दोघे फलंदाज संधी दिली गेल्यावर योग्य चमक दाखवत आहेत. रवी बिष्णोई मुंबईविरुद्धच्या सामन्यात संघात परतला आणि त्याने लगेच छाप पाडली. एका फिरकी गोलंदाजाला टी२० सामन्यात चांगल्या आणि काही ‍या मोठ्या फलंदाजांसमोर मारा करायला मोठी हिंमत दाखवावी लागते. रवी बिष्णोईने ती दाखवली असे राहुल म्हणाला.

नाणेफेक जिंकून मुंबईसारख्या तगड्या फलंदाजीला पहिले फलंदाजी करायला देणे हा धोका होता तो आम्ही पत्करला. मला गोलंदाजांना दडपण न घेता मनमोकळी गोलंदाजी करायची संधी द्यायची होती. फलंदाजी करताना कोरडा चेंडू अचानक फिरू लागतो. मी आणि ख्रीस गेलने त्याचा उलट फायदा घेतला आणि विथ द स्पीन मोठे फटके मारले, असेही राहुलने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या