IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर भगव्या लायनिंगची शायनिंग (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 27 March 2021

आयपीएलच्या पहिल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ हलक्या निळ्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरली होती.

मुंबई : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक पाचवेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ आगामी हंगामात नव्या लूकमध्ये मैदानात उतरणार आहे. फ्रेंचायझीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नव्या रंगासह अभिमानाने मैदानात उतरु, पलटन तयार का? असे कॅप्शनही देण्यात आले आहे.

नवी जर्सी संघाची ओळख असलेल्या निळ्या आणि गोल्डन रंगाची आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ हलक्या निळ्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरली होती. मात्र 2010 पासून गडद निळ्या रंगाच्या जर्सीत मुंबई इंडियन्सचा संघ दिसला आहे. ज्यावेळी मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा जर्सीचा रंग बदलला होता त्यावेळी संघ फायनलमध्ये पोहचला होता. यावेळी त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. 

INDvsENG : वनडे दरम्यान पुण्याच्या टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा खेळ

जुन्या जर्सी प्रमाणे नव्या जर्सीमध्ये खांद्यावर गोल्डन रंग दिसून येतो. जर्सीची बॉर्डर आणि कॉलरवर नारंगी रंग पाहायला मिळत आहे. गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामातही ऐतिहासिक कामगिरी करुन आपला जेतेपदाचा रेकॉर्ड आणखी उत्तम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. जर मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात जेतेपद पटकावले तर सलग तीनवेळा जेतेपद मिळवण्याचा आणखी एक विक्रम संघाच्या नावे होईल. मुंबई इंडियन्सने 2019 आणि 2020 मध्ये सातत्याने दोनवेळा जेतेपद पटकावले आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई पलटन चेन्नई सुपर किंग्जनंतर टायटल आपल्याकडे ठेवणारी दुसरी टीम ठरली होती. यंदाच्या हंगामातील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे आव्हान असणार आहे.

INDvsENG : थर्ड अंपायरने स्टोक्सला दिले नॉट आउट, कोहली झाला नाराज​

2021 च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ : रोहित शर्मा, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कूल्टर नाइल, पीयूष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंह, जेम्स नीशम आणि अर्जुन तेंडुलकर.
 


​ ​

संबंधित बातम्या