IPL 2021 Auction: स्वप्न उध्वस्त; श्रीसंतच्या रिअ‍ॅक्शनचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 February 2021

लिलावासाठी 1114 खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यातील मोजक्या 292 खेळाडूंनाचा अंतिम यादीत स्थान देण्यात आले. यात एस श्रीसंतच्या नावाचा समावेश नाही. 

IPL 2021 Auction:  इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) मध्ये आयपीएलच्या मैदानात उतरण्याचे श्रीसंतचे स्वप्न मिनी लिलावापूर्वीच उद्धवस्त झाले. 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणाऱ्या  मिनी ऑक्शन (IPL Auction) मधील खेळाडूंची यादी बीसीसीआयने जाहीर केले. यात श्रीसंतच्या नावाचा समावेश नाही. लिलावासाठी 1114 खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यातील मोजक्या 292 खेळाडूंनाचा अंतिम यादीत स्थान देण्यात आले. यात एस श्रीसंतच्या नावाचा समावेश नाही. 

2013 च्या आयपीएल हंगामात स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावरुन  एस श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. बंदी हटल्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत श्रीसंतने तब्बल 7 वर्षानंतर केरळच्या संघातून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. 75 लाख या मूळ किंमतीसह त्याची नाव नोंदणी करण्यात आली होती. मात्र बीसीसीआयने अंतिम यादीतून त्याचे नाव वगळले. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर श्रीसंतने एका गाण्याच्या माध्यमातून मनातील खंत व्यक्त केली आहे.  

जाफरसंदर्भातील धार्मिक वादाच्या प्रश्नावर अजिंक्यनं घेतला सावध पवित्रा

स्वत: गाणं गात श्रीसंतनं व्यक्त केल्या भावना

आयपीएलच्या लिलावातून नाव वगळण्यात आल्यानंतर श्रीसंतनं एक गाणं गात रिअ‍ॅक्शन दिली आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तो एक गाण गाताना दिसतो. परमेश्वराची इच्छा, क्रिकेट आणि कुटुंबियांवरील प्रेम कायम राहिल. या कॅप्शनसह त्याने  'यूं ही चला चल राही..' गाणे म्हणताचाना व्हिडिओ शेअर केलाय.  


​ ​

संबंधित बातम्या