श्रेयसच्या दुखापतीवर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही; ‘आयपीएल’लाही मुकणार?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 29 March 2021

यसच्या खांद्याला लेब्रेम टीअर झाला आहे. मात्र ही दुखापत क्षेत्ररक्षण करताना झेपावल्यावर होत नाही. 

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएललाही मुकण्याची शक्‍यता आहे. त्याच्या दुखावलेल्या डाव्या खांद्यावर दोन दिवसांत शस्त्रक्रिया होण्याची शक्‍यता आहे. क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. तो उर्वरित सामन्यात खेळणार नाही, एवढीच माहिती भारतीय मंडळाने अधिकृतपणे दिली आहे. श्रेयसच्या खांद्याला लेब्रेम टीअर झाला आहे. मात्र ही दुखापत क्षेत्ररक्षण करताना झेपावल्यावर होत नाही. 

ही दुखापत प्रामुख्याने वेटलिफ्टर अथवा भालाफेक, गोळाफेक करणाऱ्यांना होते. श्रेयसची दुखापत ग्रेड वन स्तरातील आहे. काही आठवडे विश्रांती केल्यास ती पूर्णपणे बरी होऊ शकते, पण त्याची दुखापत ग्रेड वनमधील जास्त स्वरूपाची आहे, त्यामुळे शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे. या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी बारा आठवड्याची पुनर्वसन प्रक्रिया आवश्‍यक असते. 

"मैदानात कोहली अंपायर्सचा अपमान करतो"

श्रेयस अय्यरने 2015 पासून मागील हंगामापर्यंत 79 आयपीएल सामने खेळले असून यात त्याने 16 अर्धशतकाच्या जोरावर 2200 धावा केल्या आहेत. 96 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ फायनलपर्यंत पोहचला होता. या हंगामात त्याने कर्णधाराला साजेसा खेळ करत 3 अर्धशतकांच्या जोरावर 519 धावा केल्या होत्या. ही त्याची एका आयपीएल हंगामातील सर्वाधिक धावसंख्या आहे.  

इंग्लंड विरुद्दच्या पुण्यातील पहिल्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षणालावेळी त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. स्कॅन केल्यानंतर त्याची दुखापत गंभीर आल्याचे समोर आले असून  वनडे मालिकेतील उर्वरित सामन्यात तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वनडेपूर्वी झालेल्या टी-20 मालिकेत त्याने कमालीचा खेळ दाखवला होता. कोणत्याही स्थानावर आपल्यातील क्षमता सिद्ध करण्याची तयारी असल्याची झलकच त्याने दाखवून दिली होती. 


​ ​

संबंधित बातम्या