IPL 2021: पहिल्या सामन्यात विल्यमसन का नव्हता? हैदराबादनं दिलं स्पष्टीकरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 April 2021

IPL 2021: पहिल्या सामन्यात विल्यमसनला संघात का घेतलं नव्हतं? याबाबत उत्तर दिलं आहे. 

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाची सुरुवात हैदराबादनं पराभवानं केली. कोलकाता संघानं रविवारी हैदराबादचा १० धावांनी पराभव केला.यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या अंतिम ११ खेळाडूमध्ये दिग्गज केन विल्यमसनला स्थान न दिल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. यावरुन कर्णधार वॉर्नर आणि संघ व्यवस्थापनावर टीकेची झोडही उडाली. संघात विल्यमसन नसल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. आता हैदराबाद संघानं नाराज चाहत्यांना विल्यमसनला संघात का घेतलं नव्हतं? याबाबत उत्तर दिलं आहे. 

तंदुरुस्त नसल्यामुळे पहिल्या सामन्यात अंतिम ११ मध्ये विल्यमसनची निवड करण्यात आली नसल्याची माहिती, सनराइजर्स हैदराबादचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी सामन्यानंतर दिली. ते म्हणाले की,  ''केन विल्यमसन अद्याप तंदुरुस्त नाही. त्याला तंदुरस्त होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.''

हेही वाचा : IPL 2021 : वॉर्नरच्या चुकीमुळे SRH चा पहिल्याच सामन्यात पराभव

सनराइजर्स हैदराबादने पहिल्या सामन्यात आपल्या फलंदाजीमध्ये बदल करत जॉनी बेयरस्टोला मधल्या फळती चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला. जॉनी बेयरस्टोनं कोलकाता विरोधात अर्धशतकी खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली. पण प्रशिक्षक ट्रेवर बेलिस रविवारी म्हणाले की, विल्यमसन तंदुरुस्त झाल्यानंतर बेयरस्टोच्या जागेवर खेळवलं जाईल. 

हेही वाचा ; IPL 2021 : भगव्याची शान कायम ठेवा; ऑरेंज आर्मीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 रविवारी झालेल्या सामन्यात कोलकातानं दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबाद संघाला १७७ धावापर्यंत मजल मारता आली. मनिष पांड्ये आणि बेयरस्टो यांनी अर्धशतकी खेळी केली मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.  


​ ​

संबंधित बातम्या