सफाईदार विजय शतकापेक्षा मोलाचा!

सुनंदन लेले
Saturday, 24 April 2021

सरस धावगतीसह सामना जिंकण्याची संधी होती. माझ्या शतकाकडे मला लक्ष द्यायचे नव्हते, असे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या विजयात मोलाची कामगिरी बजावलेल्या देवदत्त पदिक्कलने सांगितले.

सरस धावगतीसह सामना जिंकण्याची संधी होती. माझ्या शतकाकडे मला लक्ष द्यायचे नव्हते, असे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या विजयात मोलाची कामगिरी बजावलेल्या देवदत्त पदिक्कलने सांगितले.

कोरोनामुळे पहिल्या सामन्यास मुकलो होतो. त्यामुळे चांगली तयारी करून मैदानावर उतरण्याची घाई झाली होती. दुसऱ्याच सामन्यात चांगला खेळ करू शकलो, याचे समाधान आहे. धावगती उंचावण्यासाठी लवकर सामना जिंकण्याचे लक्ष्य होते. माझे शतक महत्त्वाचे नव्हते. विराटसह सलामीला खेळण्याचे फायदे आहेत. तो स्ट्राईक रोटेट करायला लावतो. तो सतत चर्चा करीत राहतो. आक्रमक फटकेबाजी एकाने सुरू केल्यावर दुसऱ्याने भक्कम फलंदाजी करून लयीत असलेल्या फलंदाजाला जास्त खेळायची संधी द्यायची, असा आमचा प्रयत्न असतो. आम्ही मोहीम फत्ते करूनच परतलो, याचे समाधान वाटले, असेही त्याने सांगितले. 

देवदत्तचे शतक महत्त्वाचे : कोहली
पदीक्कलने सुरेख फलंदाजी केली. त्याचे शतक करणे मोलाचे होते, असे विराट कोहलीने सांगितले. माझ्या शतकाचा विचार करु नको. मी यापुढेही शतके करीन, असे तो सतत सांगत होता. तो मीही फटकेबाजी करावी, यासाठी आग्रही होता. आपण तुझ्या या शतकाचा विचार करू, त्यानंतर पुढील शतकांबद्दल बघू, असे मी त्याला सांगितले. मी संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे. प्रत्येक खेळाडूला त्याची संघातील भूमिका सुस्पष्ट समजून दिली आहे. ते त्याला अनुसरून खेळ करायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. गोलंदाजीतील विविधता उपयोगी ठरत आहे. सिराज तिखट मारा करतोय, तर जेमीसनने माऱ्यात वैविध्य आणले. हर्षल पटेल आमच्या अपेक्षा पूर्ण करीत आहे, असेही कोहलीने सांगितले. 

योग्य पर्याय निवडणे मोलाचे 
खेळपट्टी तसेच गोलंदाजांचा विचार करून फलंदाजाने योग्य फटक्याची निवड करणे आवश्यक असते. ते निवडताना तुमच्या बलस्थानांचा वापर करायला हवा. हे लक्षात न घेतल्यास धोका वाढतो, असे संगकारा यांनी सांगितले. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेणे आणि चांगल्या चेंडूवर एकेरी-दुहेरी धावा घेत स्ट्राईक सतत बदलत ठेवणे हेच ट्वेंटी-२० क्रिकेट आहे. आघाडीच्या चार फलंदाजांनी जास्त जबाबदारी घ्यायला हवी.


​ ​

संबंधित बातम्या