IPL 2021, RCB vs KKR : पुण्याच्या राहुलचा जबऱ्या कॅच; मिस्ट्री स्पिनरच्या नावे 'विराट' विकेट (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 18 April 2021

विराटसंदर्भात कमालीचा योगायोग जुळन आला होता. पहिल्या आणि दुसऱ्या मॅटमध्ये त्याने 29 चेंडूत 33 धावा केल्या Varun Chakravarthy take Virat Vicket Rahul Tripathi brilliant catch watch video

IPL 2021, RCB vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि देवदत्त पदिक्कलने संघाच्या डावाला सुरुवात केली. पण दुसऱ्याच षटकात RCB ला मोठा झटका बसला. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने कोलकाता मोठे यश मिळवून दिले. त्याने विराट कोहलीला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद केले. 

IPL 2021, MIvsSRH Match Highlights : MI म्हणजे 'डेथ ओव्हर्सचा डेंजर झोन' (VIDEO)

 मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 29 चेंडूत 33 धावांची खेळी केली होती. या सामन्यात बुमराहने त्याची विकेट घेतली होती. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात विराटसंदर्भात कमालीचा योगायोग जुळन आला. पहिल्या मॅच प्रमाणे त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धही 29 चेंडूत 33 धावांवर बाद झाला. जेसन होल्डरने त्याची विकेट घेतली होती. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात तो या धावसंख्येच्या पुढे जाऊन विराट खेळी करेल, अशी अपक्षा त्याच्या चाहत्यांना होती. पण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर  राहुल त्रिपाठीनं जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा दाखवून देत विराटला स्वस्तात माघारी धाडले. 

IPL 2021: हार्दिक पांड्याने मॅच फिरवली? वॉर्नरसह समद रन आउट (VIDEO)

संघाच्या धावफलकावर अवघ्या 6 धावा लागल्या असताना विराट कॅच आउट झाला. त्याने एका चौकाराच्या मदतीने 6 चेंडूत पाच धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर रजत पाटिदार पुन्हा अपयशी ठरला. संकटात सापडलेल्या RCB च्या संघाचा डाव मॅक्सवेल-पडिक्कल जोडीने सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची खेळी केली.
 


​ ​

संबंधित बातम्या