आयपीएलचे सामने लसीकरण पूर्ण झालेल्यांना पाहता येणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 June 2021

तुम्ही अमिरातीत राहत असाल आणि तुमचे लसीकरण पूर्ण (दोन्ही डोस) झाले असेल तर तुम्ही अमिरातीत होणारे उर्वरित आयपीएलचे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहू शकाल. अमिराती क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेडियम क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात येणार आहे.

दुबई - तुम्ही अमिरातीत राहत असाल आणि तुमचे लसीकरण पूर्ण (दोन्ही डोस) झाले असेल तर तुम्ही अमिरातीत होणारे उर्वरित आयपीएलचे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहू शकाल. अमिराती क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेडियम क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात येणार आहे.

उर्वरित आयपीएलचे वेळापत्रक अजून निश्चित व्हायचे आहे. ते झाल्यावर प्रेक्षकांच्या उपस्थितीचाही निर्णय जाहीर करण्यात येईल. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला दुबईमध्ये आहेत. बुधवारी त्यांची अमिराती क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे आणि आयपीएलचे नियोजन तेव्हाच निश्चित होईल असे सांगण्यात येत आहे.

अमिरातीत कोरोनावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवलेले आहे. तेथील ७० टक्के स्थानिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे ज्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात काहीच हरकत नसल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही, त्यांना अमिरातीमध्ये प्रवेश नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राजीव शुक्ला अगोदरच दुबईत दाखल झालेले आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आयसीसीच्या बैठकीसाठी दुबईला जाणार आहेत.


​ ​

संबंधित बातम्या