ZIM vs PAK: किंग कोहलीला बाबर देतोय तगडी फाईट; 'विराट' वर्ल्ड रेकॉर्ड रडारवर

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 20 April 2021

 या शतकासह त्याने विराट कोहलीचा वर्ल्ड विक्रम मागे टाकण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. 

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या दमदार कामगिरीनं दिग्गजांना मागे टाकत आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहलीची जागा घेतल्यानंतर आता तो कोहलीचा आणखी एक विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. वनडे क्रमवारीत नुकतेच त्याने विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकत अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर टी-20 क्रिकेटमधील विराट विक्रम त्याच्या रडारवर आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात बाबर आझमने टी 20 मधील पहिले वहिले शतक झळकावले होते. या शतकासह त्याने विराट कोहलीचा वर्ल्ड विक्रम मागे टाकण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. 21 एप्रिल पासून झिम्बाब्वे-पाकिस्तान यांच्यातील टी20 मालिकेला (ZIM vs PAK) सुरुवात होणार आहे. या मालिकेत बाबरला विराट कोहलीचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. 
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका रंगणार आहे. हरारेच्या मैदानात होणाऱ्या या सामन्यात बाबर आझमने जर लक्षवेधी खेळ केला तर विराट कोहलीचा विक्रम मोडून क्रिकेट जगतात तो नवा विश्वविक्रम प्रस्थापित करु शकतो. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिकेत 3-1 असा विजय नोंदवला होता. एवढेट नाही तर वनडेतही त्यांनी 2-1 असे यश मिळवले होते. 

IPL 2021: धोनी लवकरच थांबेल, वॉनचं CSK च्या नव्या कॅप्टनसंदर्भात मोठे विधान

पाकिस्तान संघाचा आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील कामगिरी जबरदस्त अशीच आहे. संघाने आतापर्यंत100 हून अधिक सामने जिंकले आहेत. इतर कोणत्याही संघाला असा पराक्रम करणे जमलेलं नाही. भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपूर्वी झिम्बाब्वे दौरा पाकिस्तानसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

बाबरला खुणावतोय विराटचा विश्वविक्रम 

26 वर्षीय पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आंतरराष्ट्रीय टी-20 मधील 51 सामन्यातील 49 डावात 49 च्या सरासरीने 1940 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये 2000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी बाबर आझमला 60 धावा कमी आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यावर हा पल्ला गाठत नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याची संधी बाबरकडे आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम सध्या विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने 56 डावात हा पल्ला गाठला होता.  


​ ​

संबंधित बातम्या