भारत विजयाच्या मार्गावर; इंग्लंडचे चार फलंदाज बाद! 

वृत्तसंस्था
Tuesday, 21 August 2018

नॉटिंगहॅम : फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर वेगवान गोलंदाजांनीही भेदक मारा करत इंग्लंडला तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पराभवाच्या दिशेने ढकलले. भारताने इंग्लंडला 521 धावांचे अशक्‍यप्राय आव्हान दिले. त्यानंतर चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पहिल्या 43 षटकांत चार बाद 106 धावा झाल्या होत्या. 

ईशांत शर्माने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. सलामीवीर किटन जेनिंग्जला ईशांतने एका अप्रतिम चेंडूवर बाद केले. त्यानंतर दोनच षटकांनंतर ऍलिस्टर कूकलाही त्याने माघारी धाडले.

कर्णधार ज्यो रूटचा अडथळा जसप्रित बुमराहने दूर केला; तर ऑली पोपला महंमद शमीने बाद केले. भारताविरुद्धच्या गेल्या तीन डावांमध्ये अनुभवी कूकला ईशांतनेच बाद केले आहे. 

सामना वाचविण्यासाठी इंग्लंडला आजचा उर्वरित दिवस आणि उद्याचा संपूर्ण दिवस खेळून काढणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी इंग्लंडकडे केवळ सहा फलंदाज शिल्लक आहेत आणि त्यातील एक-यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टॉचे बोट फ्रॅक्‍चर झाले आहे. त्यामुळे 'संघासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल' तरच बेअरस्टॉ फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. 

​ ​

संबंधित बातम्या