पो-कबड्डी - पिंक पॅंथर्सची प्ले-ऑफची धडपड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

- प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या मोसमात शुक्रवारी जयपूर पिंक पॅंथर्सने बंगळूर बुल्सचा 41-34 असा पराभव करून प्ले-ऑफ मधील आव्हान राखण्याची आपली धडपड कायम ठेवली

- त्यांचे आता 57 गुण झाले असून, ते सातव्या स्थानावर आहेत. प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी त्यांना युपी योद्धाजला मागे टाकावे लागेल

- युपी योद्धाजचे चार सामने बाकी आहेत. त्यांचे 58 गुण असून, त्यांना चारपैकी एका सामन्यातील विजय त्यांना प्ले-ऑफमध्ये घेऊन जाणार आहे. 

पंचकुला ः प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या मोसमात शुक्रवारी जयपूर पिंक पॅंथर्सने बंगळूर बुल्सचा 41-34 असा पराभव करून प्ले-ऑफ मधील आव्हान राखण्याची आपली धडपड कायम ठेवली. मात्र, त्यांना प्ले-ऑफच्या शिक्कामोर्तबासाठी युपू योद्धाज संघाच्या प्रगतीवर अवलंबून रहावे लागेल. 
जयपूर संघाने आज दीपक हुडाच्या गैरहजेरीतही चांगले प्रदर्शन करून मोठा विजय मिळविला. अखेरच्या सेकंदाला बंगळूरवर लोण देत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांचे आता 57 गुण झाले असून, ते सातव्या स्थानावर आहेत. प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी त्यांना युपी योद्धाजला मागे टाकावे लागेल. मात्र, त्यांच्यासाठी ती केवळ आशाच असेल. कारण, त्यांचा केवळ एकच सामना बाकी आहे आणि उद्यापासून अखेरचा टप्पा आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या यूपी योद्धाजचे चार सामने बाकी आहेत. त्यांचे 58 गुण असून, त्यांना चारपैकी एका सामन्यातील विजय त्यांना प्ले-ऑफमध्ये घेऊन जाणार आहे. 
जयपूरने आज मिळविलेल्या विजयात दीपक नरवालचा खेळ निर्णायक ठरला. मोसमात प्रथमच दीपक आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवू शकला. त्याला निलेश साळुंके आणि विशालच्या भक्कम बचावाची साथी मिळाली. त्याने "हाय फाईव्ह' कामगिरी केली. दीपकने सुपर टेन कामगिरी केली. बंगळूर बुल्स संघाकडून पवन शेरावत याने आणखी एक सुपर टेन कामगिरी केली. पण, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. बंगळूरने यापूर्वीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या