World Cup 2019 : हार्दिकने गोलंदाजीत प्रगती करावी : कपिल

वृत्तसंस्था
Wednesday, 12 June 2019

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : हार्दिक पंड्याने परिपूर्ण अष्टपैलू होण्यासाठी आपल्या गोलंदाजीत सुधारणा करावी, सध्या तो फलंदाज अधिक आणि गोलंदाज कमी आहे, असे स्पष्ट मत हार्दिकची तुलना करण्यात येत असलेल्या कपिलदेव यांनी व्यक्त केले.

जानेवारी 2016 मध्ये पदार्पण केल्यानंतर हार्दिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने काही सामन्यात विजय मिळवून दिलेले आहेत, त्या तुलनेत गोलंदाजीतील त्याची कामगिरी सामान्य राहिलेली आहे.

हार्दिकची कोणाशी तुलना करू नका, त्याला त्याचा खेळ करू द्या. आपण सर्वांनी त्याची क्षमता आणि गुणवत्ता पाहिलेली आहे. माझ्यापेक्षा तो मोठा झालेला मला पहायचे आहे. अष्टपैलू म्हणून तो आपले योगदान देत असला तरी त्याचे अष्टपैलूत्व फलंदाजीकडे अधिक झुकलेले आहे. त्यामुळे त्याने गोलंदाजीत प्रगती करायला हवी, तो संघासाठी खेळतो हे सर्वात महत्वाचे आहे. असे कपिलदेव यांनी सांगितले. 47 एकदिवसीय सामने खेळलेल्या हार्दिकची फलंदाजीतील सरासरी 30.53 अशी आहे. एक कसोटी शतकही त्याच्या नावावर आहे. गोलंदाजीत मात्र त्याची सरासरी 41.97 अशी आहे. यात त्याने 44 विकेट मिळवलेले आहेत. तर 11 कसोटीत 31.05 च्या सरासरीने 17 विकेट मिळवलेल्या आहेत. झपाट्याने प्रगती करत असल्यामुळे हार्दिकची तुलना कपिदेव यांच्याशी केली जात आहे. हार्दिकलाही ही तुलना मान्य नाही, मला माझ्याप्रमाणे राहुद्या असे तो म्हणतो.

पाकविरूद्ध भारतच फेव्हरिट

दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करणाऱ्या भारताच्या कामगिरीबाबत बोलताना कपिलदेव म्हणाले, या दोन बलाढ्य संघाविरूद्ध भारताने चांगला खेळ केला आहे, उद्याच्या सामन्यात पाऊस पडला नाही तर हाच फॉर्म कायम रहाण्यास काहीच हरकत नाही. पाकिस्तानविरूद्ध सांगायचे तर आम्ही ज्या वेळी खेळायचो त्यावेळी पाकिस्तानला फेव्हरिट समजले जायचे पण आता आपला संघ अधिक बलवान आहे त्यामुळे आपल्या संघाला पसंती मिळणे स्वाभाविक आहे. 

​ ​

संबंधित बातम्या