हजारे करंडक क्रिकेट -कर्नाटकचा झारखंडवर दणदणीत विजय

वृत्तसंस्था
Thursday, 26 September 2019

-फलंदाजांच्या जोरकस कामगिरीनंतर के. गौतमच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटक संघाने गुरुवारी विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत झारखंडवर 123 धावांनी दणदणीत विजय मिळविला. 

-गोवा विरुद्ध आंध्र प्रदेश सामना 21 षटकांचा खेळविण्यात आला. यात आंध्र प्रदेशने गोव्याचा 7 गडी राखून पराभव केला.

-सौराष्ट्र वि. केरळ सामना 34 षटकांचा खेळविण्यात आला. केरळने 9 बाद 186 धावा केल्यानंतर सौराष्ट्राने 33.4 षटकांत 7 बाद 187 धावा करून 3 गडी राखून विजय मिळविला.

-स्पर्धेतील अ गटातील तीन सामने झाले असले, तरी "ब' गटातील एकही सामना होऊ शकला नाही. या गटातील सामने बडोदा येथे सुरू असून, येथील हरियाना वि. ओडिशा, महाराष्ट्र वि. उत्तर प्रदेश आणि पंजाब वि. विदर्भ हे तीनही सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.

बंगळूर - फलंदाजांच्या जोरकस कामगिरीनंतर के. गौतमच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटक संघाने गुरुवारी विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत झारखंडवर 123 धावांनी दणदणीत विजय मिळविला. 
देवदूत पडीक्कल (58), कर्णधार मनीष पांडे (52) आणि पवन देशपांडे (70) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 285 धावा केल्या. झारखंडच्या राहुल शुक्‍ला आणि आनंद सिंग यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. 
आव्हानाचा पाठलाग करताना मात्र झारखंडचा डाव गौतमच्या माऱ्यापुढे गडगडला. निम्मा संघ 97 धावांत गारद झाल्यावर त्यांचे उर्वरित फलंदाज केवळ 65 धावाच करू शकले. गौतमने 43 धावांत 5 गडी बाद केले. 

पावसाचाच व्यत्यय 
स्पर्धेतील अन्य सामन्यांत पावसाचाच खेळ अधिक झाला. अलूर येथे गोवा विरुद्ध आंध्र प्रदेश सामना 21 षटकांचा खेळविण्यात आला. यात आंध्र प्रदेशने गोव्याचा 7 गडी राखून पराभव केला. गोव्याला 9 बाद 107 असे रोखण्यात यश आल्यावर आंध्रने 20.2 षटकांत 3 बाद 112 धावा केल्या. बंगळूर येथीलच सौराष्ट्र वि. केरळ सामना 34 षटकांचा खेळविण्यात आला. केरळने 9 बाद 186 धावा केल्यानंतर सौराष्ट्राने 33.4 षटकांत 7 बाद 187 धावा करून 3 गडी राखून विजय मिळविला. 

ब गटात पाऊस 
स्पर्धेतील अ गटातील तीन सामने झाले असले, तरी "ब' गटातील एकही सामना होऊ शकला नाही. या गटातील सामने बडोदा येथे सुरू असून, येथील हरियाना वि. ओडिशा, महाराष्ट्र वि. उत्तर प्रदेश आणि पंजाब वि. विदर्भ हे तीनही सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. या तीनही सामन्यांतील संघांना प्रत्येकी दोन गुण देण्यात आले. 


​ ​

संबंधित बातम्या