कौशल धर्मामेरचे दुसरे विजेतेपद

वृत्तसंस्था
Monday, 30 September 2019

- भारताचा युवा बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेर याने मालदीव आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतपद मिळविले.

-अंतिम फेरीत त्याने आपल्याच देशाच्या सिरील वर्मा याचा 21-13, 21-18 असा पराभव केला.

महिला दुहेरीत भारताच्या आश्‍विन पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

- मिश्र दुहेरीत साईप्रतीक कृष्ण प्रसाद-अश्‍विनी भट, पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज-संयम शुक्‍ला यांनाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

मालदीव ः भारताचा युवा बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेर याने मालदीव आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतपद मिळविले. अंतिम फेरीत त्याने आपल्याच देशाच्या सिरील वर्मा याचा 21-13, 21-18 असा पराभव केला.

या मोसमातील त्याचे हे दुसरे विजेतेपद ठरले. गेल्याच आठवड्यात त्याने म्यानमार येथील याच मालिकेतील स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

महिला दुहेरीत भारताच्या आश्‍विन पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांना जपानच्या सायाक होबारा-नात्सुकी सोनी जोडीकडून 10-21, 21-17, 12-21 असा पराभव पत्करावा लागला.

मिश्र दुहेरीत साईप्रतीक कृष्ण प्रसाद-अश्‍विनी भट, पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज-संयम शुक्‍ला यांनाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. साईप्रतीक-अश्‍विनीला थायलंडच्या चालोम्फोन चारोइन्चिटामोर्न-चासिनी कोरपाप जोडीकडून 11-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. जपानच्या केईशिरो मात्सुई-योशिनोरी ताकूची जोडीने भारताच्या अरुम-संयम यांचा 21-9, 22-20 असा पराभव केला. 


​ ​

संबंधित बातम्या