आशिआई क्रीडा स्पर्धेत खो-खोचा समावेश?

वृत्तसंस्था
Tuesday, 17 March 2020

खो-खो हा खेळ सध्या 25 देशांत खेळला जातो. त्यास दोन वर्षांपूर्वी आशिया ऑलिंपिक परिषदेने खेळ म्हणून मंजुरी दिली. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याचा समावेश असेल, अशी आशा आशियाई खो-खो महासंघाचे अध्यक्ष असलेल्या मेहता यांनी व्यक्त केली

नवी दिल्ली : सहा वर्षांनी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खो-खोचा समावेश होईल, अशी अपेक्षा भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी व्यक्त केली; मात्र त्याच वेळी आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी दोन वर्षांनी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खो-खो असेल, असे मत व्यक्त केले.

खो-खो हा खेळ सध्या 25 देशांत खेळला जातो. त्यास दोन वर्षांपूर्वी आशिया ऑलिंपिक परिषदेने खेळ म्हणून मंजुरी दिली. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याचा समावेश असेल, अशी आशा आशियाई खो-खो महासंघाचे अध्यक्ष असलेल्या मेहता यांनी व्यक्त केली; तर मित्तल यांनी 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खो-खो हा प्रदर्शनीय खेळ नक्की असेल, असे मत व्यक्त केले.

शरथ कमलने जींकली ओमान ओपन स्पर्धा, १० वर्षांचा दुष्काळ संपवला

तीन आशियाई खो-खो स्पर्धांचे यशस्वी आयोजन झाले आहे. आता 1996 (भारत), 2000 (बांगलादेश) आणि 2016 (भारत) या स्पर्धेपाठोपाठ येत्या ऑगस्टमध्ये नवी दिल्लीत चौथी आशियाई स्पर्धा अपेक्षित आहे. खो-खोची लोकप्रियता वाढवण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड तसेच नेपाळविरुद्ध मालिकाही खेळला आहे. लवकरच भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिका होणार आहे. भारताचे खो-खो मार्गदर्शक दक्षिण कोरिया, इराण, अफगाणिस्तान, सिंगापूर तसेच श्रीलंकेत मार्गदर्शन करीत आहेत.

Tokyo Olympics : स्पर्धेत घडला हा इतिहास

खो-खोचे तांत्रिक ज्ञान देण्यासाठी भारतीय महासंघाने आंतरराष्ट्रीय मार्गदर्शन शिबिर घेतले आहे. त्यातील पहिला टप्पा नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 23 फेब्रुवारी ते 20 मार्चदरम्यान आहे. त्यात 16 देशांतील 66 खेळाडूंचा सहभाग होता. कोरोनामुळे यात नऊ देश सहभागी होऊ शकले नाहीत, असे मेहता यांनी सांगितले.

टोकियो ऑलिंपिक लांबणीवर? ऑलिंपिकमंत्र्यांचेच संकेत

खो-खो लीगसाठी आता 27 नोव्हेंबरचा वादा

अल्टिमेट खो-खो लीगच्या तारखा सतत पुढे जात आहेत. आता ही लीग 27 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरदरम्यान होईल, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर या लीगमधील लढती दिल्ली, पुणे आणि हैदराबादला होतील, असेही सांगण्यात आले. या लीगच्या प्रक्षेपणाच्या वेळी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले. या लीगमध्ये दिल्ली शिबिरात सहभागी झालेले परदेशी खेळाडू असतील.


​ ​

संबंधित बातम्या