Schoolympics 2019 : बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत उपाध्ये, जैन, घोडकेची आगेकूच
मुलांच्या बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत उपाध्ये, जैन, घोडकेची आगेकूच. मॅप्रो स्कूलिंपिक्स स्पर्धेंतर्गत बॅडमिंटन स्पर्धा सासने मैदानावरील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू आहे.
कोल्हापूर : मुलांच्या बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत १२ वर्षांखालील गटात साकेत उपाध्ये, दक्ष जैन, शौर्य घोडके, जयवर्धन इंगळे, समर्थक कोकाटे, १४ वर्षांखालील गटात मयूर कुराडे, पार्थ रणदार, अन्वित मुळीक, विजयशक्ती नायडू, पार्श्व पोरवाल, तर १६ वर्षांखालील गटात वरद केवडे, मिहीर भूरत, सुजल सोलापुरे, राजवर्धन सिंग, मोहित भोसलेने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरविले. मॅप्रो स्कूलिंपिक्स स्पर्धेंतर्गत बॅडमिंटन स्पर्धा सासने मैदानावरील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू आहे.
निकाल असा :
१२ वर्षांखालील गट -: साकेत उपाध्ये (शांतिनिकेतन) वि. वि. अर्णव देवगडे (पोद्दार इंटरनॅशनल) , दक्ष जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई) वि. वि. हर्षवर्धन नेहरा (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) , शौर्य घोडके (छत्रपती शाहू, सीबीएसई) वि. वि. शौर्य मेहता (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम) , जयवर्धन इंगळे (छत्रपती शाहू, सीबीएसई) वि. वि. हर्षवर्धन अस्वले (कोल्हापूर पब्लिक) , समर्थ कोकाटे (सेंट झेवियर्स) वि. वि. ओंकार पाटील (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम) .