Schoolympics 2019 : घोडावत स्कूलचा धडाका विवेक जाधवची हॅट्ट्रिक
मुलांच्या हॉकी स्पर्धेतील साखळी फेरीत नरकेज पन्हाळा पब्लिक, डी. सी. नरके, संजीवन पब्लिक, एम. जी. पाटील, संजय घोडावत इंटरनॅशनल, संजीवन, दत्ताबाळ हायस्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली.
कोल्हापूर : मुलांच्या हॉकी स्पर्धेतील साखळी फेरीत नरकेज पन्हाळा पब्लिक, डी. सी. नरके, संजीवन पब्लिक, एम. जी. पाटील, संजय घोडावत इंटरनॅशनल, संजीवन, दत्ताबाळ हायस्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
निकाल असा :
नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल वि. वि. विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल (१-०, नरकेजकडून प्रणव सावंतचा गोल) , डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज वि. वि. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल (४-०, नरकेकडून ऋतुराज कदमचे दोन , यशराज पाटील, ओम खोतचा प्रत्येकी एक गोल) . संजीवन पब्लिक स्कूल वि. वि. बळवंतराव यादव हायस्कूल (३-०, संजीवनकडून नितीन शिंदेची हॅट्ट्रिक).
एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन वि. वि. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (१-०, एम. जी. पाटीलकडून तुषार पाटीलचा गोल) . संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) वि. वि. विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल (५-०, घोडावतकडून विवेक जाधवची हॅट्ट्रिक , पृथ्वीराज यादव , प्रेम पाटीलचा प्रत्येकी एक गोल) . संजीवन विद्यानिकेतन वि. वि. दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल (१-०, संजीवनकडून राजवर्धन भोसलेचा गोल) . दत्ताबाळ हायस्कूल वि. वि. नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल (४-०, रितेश सावतेकरचे दोन, ओमकार शिंदे, अशितोष पाटीलचा प्रत्येकी एक गोल).