Schoolympics 2019 : विमला गोयंका स्कूलची ‘न्यू मॉडेल’ वर मात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

मुलींच्या हॉकी स्पर्धेतील साखळी फेरीत विमला गोयंका, न्यू इंग्लिश, बळवंतराव यादव, सी. बी. पाटील विद्यालयाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना आज पराभूत केले.

कोल्हापूर : मुलींच्या हॉकी स्पर्धेतील साखळी फेरीत विमला गोयंका, न्यू इंग्लिश, बळवंतराव यादव, सी. बी. पाटील विद्यालयाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना आज पराभूत केले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल असा :

विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल (४-०, विमला गोयंकाकडून शिल्पा जग्गनावस, तन्वी पुणेकर, आस्था महाजन, श्रुती तळंदगे यांचे गोल), न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वि. वि. प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल (३-०, सौमया कादळगे, माधुरी भोसले, कृष्णा मानेचा गोल). बळवंतराव यादव हायस्कूल वि. वि. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल (४-०, यादव हायस्कूलकडून स्नेहाली पाटीलचे दोन, प्रतिभा माने, श्रुती धोंगडेचा प्रत्येकी एक गोल). सी. बी. पाटील विद्यालय वि. वि. ज्योतिर्लिंग विद्यामंदिर (१-०, सी. बी. पाटीलकडून सोनाली पाटीलचा गोल). ज्योतिर्लिंग विद्यामंदिर विरुद्ध प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल यांच्यातील सामना गोलशून्य 
बरोबरीत राहिला.


​ ​

संबंधित बातम्या