Schoolympics 2019 : मुलींच्या कबड्डी स्पर्धेत राजर्षी शाहू क्रीडा प्रशालेस मुलींच्या गटात जेतेपद
मुलींच्या कबड्डी स्पर्धेत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेने विजेतेपद पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे.
कोल्हापूर : मुलींच्या कबड्डी स्पर्धेत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेने विजेतेपद पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. शिंगणापूरमधील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धा झाली.
राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला विरुद्ध उषाराजे हायस्कूल यांच्यात अंतिम सामना झाला. यात शाहू प्रशालेने उषाराजेचा ३३-६ गुणफरकाने पराभव केला. तृतीय क्रमांकाच्या लढतीत शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलने दानोळी हायस्कूलवर १८-१० गुणफरकाने मात केली.
राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेचा विजयी संघ असा : अनुराधा अवादन, साक्षी चौगले, प्रतीक्षा जाधव, नेहा कुंभार, उषा नाईक, अनुराधा निकम, आस्था पाटील, पूनम पाटील, साक्षी पाटील, सलोनी पाटील, श्रुतिका रेडेकर, साक्षी कुंभार.