Schoolympics 2019 : कबड्डी स्पर्धेत राजर्षी शाहू क्रीडा प्रशाला भारी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

मुलांच्या कबड्डी स्पर्धेत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेने विजेतेपद पटकाविले. 

कोल्हापूर  : मुलांच्या कबड्डी स्पर्धेत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेने विजेतेपद पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत ही स्पर्धा आहे. शिंगणापूरमधील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

अंतिम सामन्यात राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेने एकोंडीच्या नागनाथ विद्यालयाला ३८-२६ गुणफरकाने हरविले. तृतीय क्रमांकाच्या लढतीत शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलने कुडित्रेच्या डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजला ३१-१४ गुणफरकाने पराभूत केले. 

विजेता संघ असा :

ऋषीकेश बबनावर, रवी बंडीवादर, लकी बुचडे, प्रज्योत चौगले, अज्ञेश मुडशिंगीकर, शिवम मुळीक, ऋषीकेश निर्मल, हर्षवर्धन पाटील, ओमकार पाटील, रोहित पाटील, शुभम रेपे, 
प्रथमेश वाईगडे.


​ ​

संबंधित बातम्या