Schoolympics 2019 : एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नंदिता पाटील, नेहा जाधवसह समृद्धी पवार, ऋचा विजयी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

बारा वर्षाखालील मुलींच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नंदिता पाटील, अदिती तेंडूलकर, नेहा जाधव, अद्विता पाटील, चौदा वर्षाखालील पृथा देशपांडे, श्रावणी पाटील, राशी नहार, स्वराली पेंडसे, प्रांजल काजवे, तर सोळा वर्षांखालील गटात समृद्धी पवार, तनुजा सलगर व ऋचा कुलकर्णीने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

कोल्हापूर :  बारा वर्षाखालील मुलींच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नंदिता पाटील, अदिती तेंडूलकर, नेहा जाधव, अद्विता पाटील, चौदा वर्षाखालील पृथा देशपांडे, श्रावणी पाटील, राशी नहार, स्वराली पेंडसे, प्रांजल काजवे, तर सोळा वर्षांखालील गटात समृद्धी पवार, तनुजा सलगर व ऋचा कुलकर्णीने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सासने मैदानावरील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल असा :

१२ वर्षाखालील - नंदिता पाटील (सेंट झेव्हियर्स) वि. वि. नेतल जेटलिया (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) , अदिती तेंडूलकर (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. आर्या देशपांडे (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) , नेहा जाधव (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. सई देशमुख (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल) . अद्विता पाटील (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. गार्गी जोशी (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी). 

१४ वर्षाखालील- पृथा देशपांडे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. मधुरा पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) , श्रावणी पाटील (कोल्हापूर पब्लिक स्कूल) वि. वि. कृष्णा अधरापुरापू (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई). राशी नहार (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. समीरा कुलकर्णी (होलिक्रॉस कॉन्व्हेंट), स्वराली पेंडसे (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल) वि. वि. अमीप्रिता साखरदांडे (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी), प्रांजल काजवे (राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम) वि. वि. वैष्णवी पाटील (विजयादेवी यादव 
इंग्लिश मीडियम). 

१६ वर्षाखालील- समृद्धी पवार (विमला गोएंका इंग्लिश मीडियम) वि. वि. वैष्णवी पाटील (न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), तनुजा सलगर (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. सिद्धी चव्हाण (संजीवन पब्लिक स्कूल), ऋचा कुलकर्णी (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल) वि. वि. आर्या देसाई (कोल्हापूर पब्लिक स्कूल).


​ ​

संबंधित बातम्या