राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत कोल्हापूर, नाशिक, मुंबईचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 November 2019

स्पर्धेतील दूसरा दिवशीही राज्यातील विविध खेळाडूंनी आपले काैशल्य सिद्ध करुन प्रेक्षकांची मने जिंकली.

सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाईतील किसन वीर कॉलेजमधील सुशांत मनोहर जेधे याने तीन हजार मीटर धावणेचे अंतर नऊ मिनिटांत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकाविला. याबरोबरच गोळाफेकमध्ये आनंदराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील शिवराज जाधव, कऱ्हाडच्या विठामाता विद्यालयातील राजनंदिनी सोनवणेने प्रथम क्रमांक मिळविला.

स्पर्धेतील विविध वयोगटातील, तसेच क्रीडा प्रकारातील निकाल असा 

14 वर्षांखालील मुले ः 100 मीटर धावणे ः लाहील नुनेस (12ः10, सेंट मेरीज हायस्कूल, मुंबई विभाग), सनी कुरावाह (12ः20, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडापीठ), आर्य कंदकुमार (12ः40, डॉन बॉस्को हायस्कूल, मुंबई).

लांब उडी ः शाहनवाज खान (5.95 मीटर, एच.ओ.सी.एल. स्कूल, रायगड), सनी कुरावाह (5.87 मीटर, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडापीठ), आर्य कंदकुमार (5.77 मीटर, डॉन बॉस्को हायस्कूल, मुंबई).

गोळाफेक ः शिवराज जाधव (12.99 मीटर, आनंदराव चव्हाण माध्यमिक व उच्च व माध्यमिक विद्यालय, कोल्हापूर विभाग), रामेश्‍वर महतो (12.15 मीटर, वईनिती इंग्लिश मीडियम स्कूल, निफाड, नाशिक), उपेश धनलगडे (11.91 मीटर, ल. न. वेशिंग विद्यालय, जामखेड, पुणे).
 
14 वर्षांखाली मुली ः उंच उडी ः सुरेखा फराकटे (1.43 मीटर, कबनूर हायस्कूल, कबनूर), शर्वरी गाडगीळ (1.38 मीटर, बालभारती पब्लिक स्कूल, नवी मुंबई), दर्शना जाधव (1.38 मीटर, विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, साखराळे).

थाळीफेक ः पल्लवी काळेल (32.13 मीटर, डी. एच. कवठेकर प्रशाला, पंढरपूर), प्रचिती पाटील (32.06 मीटर, व्ही. ई. एम. एस. राजारामनगर, कोल्हापूर), अक्षता थोरात (30.75 मीटर, डी. के. टी. ई. इचलकरंजी, कोल्हापूर).

17 वर्षांखालील मुले आणि मुलींचा निकाल 
 
17 वर्षांखालील मुले ः 3000 मीटर धावणे ः ओंकार पन्हाळकर (9ः12ः50, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडापीठ), रमेश कल्याणी (9ः13ः20, जागृती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज), कार्तिक कारीहरपाल (9ः13ः50, के. टी. एच. एम. कॉलेज, नाशिक). 17 वर्षांखालील मुली ः 3000 मीटर धावणे ः रिंकी पावरा (10ः13ः30, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, राजबडी, नाशिक), पल्लवी जगदाळे (10ः19ः40, भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक), सृष्टी रेडेकर (10ः37ः10, एस. एस. हायस्कूल, नेसरी, कोल्हापूर).

गोळाफेक ः राजनंदिनी सोनवणे (12ः01 मीटर, विठामाता विद्यालय, कऱ्हाड), हंसिका वासू (11.95, सेंट अन्सिस हायस्कूल, मदामकामा), सुरुची जगताप (11.40, एम. इ. एस. वाघिरे कॉलेज, सासवड).

19 वर्षांखालील मुले आणि मुलींचा निकाल 

19 वर्षांखालील मुले ः 100 मीटर धावणे ः आदिती परब (12 ः 50, के. जे. सोमय्या सायन्स ऍण्ड कॉमर्स, मुंबई), सानिका काटे (12 ः 80, रामानंद आर्या, मुंबई विभाग), आभा साळुंखे (13ः10, डॉ. शामराव कलमाडी ज्युनिअर कॉलेज, पुणे).

3000 मीटर धावणे ः सुशांत जेधे (09ः00ः85, किसन वीर कॉलेज, वाई), किरण मात्रे (09ः05ः70, गोकुळनाथ विद्यालय, पिंगळी, औरंगाबाद), पवन टारपे (09ः07ः54, जनता इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, साईटवेंग, नाशिक).

मुली ः 3000 मीटर धावणे ः प्राजक्ता शिंदे (10ः26ः90, छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज, नेसरी), ताई ब्राह्मणे (10ः50ः45, विद्याप्रबोधिनी प्रशाला, नाशिक), आकांक्षा शेलार (10ः57ः20, किसन वीर महाविद्यालय, वाई).

 आयाेजनाबाबत खेळाडूंमध्ये समाधान 

या स्पर्धेतील 17 वर्षांखालील वयोगटाची स्पर्धा अन्यत्र होणार होती. त्याचेही नियोजन सातारा जिल्ह्यास सोपवले. अल्पावधीत क्रीडा कार्यालयाने खेळाडूंना उत्तमरीत्या सोयीसुविधा दिल्या. स्पर्धेतील यशस्वितांना जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक, तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे व्यासपीठ उभारले आहे. यामुळे स्पर्धा संयोजनाचे राज्यातील खेळाडूंमध्ये समाधानकारक वातावरण आहे.

 

 


​ ​

संबंधित बातम्या