युरोपातून परतलेला संगकारा होणार सेल्फ क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 March 2020

श्रीलंकेत आजवर 80 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत, तर जगभरात 14000 लोक या व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडले आहेत.

कोलंबो : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा सेल्फ क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे, तो नुकताच युरोपच्या दौऱ्यहून परत आला असून श्रीलंकेच्या सरकारने युरोपातून येणाऱ्या प्रत्येकाला एकांतात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार संगकाराने स्वत:ला इतरांपासून 14 दिवसांसाठी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

संगकाराने पत्रकारांना सांगितले की, “मला कोरोनाची कुठलीही लक्षणे जाणवत नाहीत, तरी देखील मी प्रशासनाकडून सांगीतल्या गेलेल्या नियमांचे पालन करत आहे. मी बातम्यांमध्ये वाचल्या प्रमाणे पोलिसांत नावं नोंदवलं आहे त्यासोबतच खबरदारी म्हणून एकांतात राहाणार आहे.” संगकारा सोशल मिडीयावर सतत श्रीलंकेतील लोकांना कोरोना व्हायरस विषयी माहिती देत असतो. 

पत्नीने खाते हॅक केल्यापासून भुवनेश्वरने सोडलं फेसबुक 

श्रीलंकेत आजवर 80 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत, तर जगभरात 14000 लोक या व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरलेल्या देशांमध्ये प्रवास करुन परतलेल्या लोकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. बाहेरदेशातून आलेले नागरिख एकांतात राहतील याची पोलिस खबरदारी घेत आहेत.
 


​ ​

संबंधित बातम्या