26 सेकंदात सलग शंभरवेळा किक; चिमुकल्याने रचला वर्ल्ड रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 February 2021

कोरोना काळात घरी असल्यामुळे सक्षमच्या या कलेला आई-वडिलांनी ओळखून त्याला प्रोत्साहित केले. 

पुणे: ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण तुम्ही नक्की ऐकली असेल. पण पाळण्यातील हलणाऱ्या याच पायांनी चक्क वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. अवघे तीन वर्षे वय असलेला सक्षम परेश वाघेला या चिमुकल्याने किक मारण्याचा अनोखा विक्रम केलाय. त्याची‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. 

400 मीटर हर्डल्समध्ये चुरशीच्या शर्यतीत पुण्याच्या सिद्धेशची सुवर्ण कामगिरी

फुटबॉलला जलद गतीने तीन मिनिटे 26 सेकंदात सलग शंभरवेळा किक मारून त्याने हा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा सक्षम हा सर्वांत लहान बालक ठरला आहे. याआधी हा विक्रम चेन्नईमधील सिद्धार्थने वयाच्या तीन वर्ष आठ महिने असताना केला होता. कोरोना काळात घरी असल्यामुळे सक्षमच्या या कलेला आई-वडिलांनी ओळखून त्याला प्रोत्साहित केले. 

पोलिस काकांच्या लेकीची गोल्डन कामगिरी; राष्ट्रीय स्तरावर उंचावलं साताऱ्याचं नाव

त्याचे वडील म्हणाले, ‘‘सक्षमने वयाच्या दोन वर्ष अकरा महिन्यांचा असताना हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्याला अपयश आले. लॉकडाउनच्या काळात त्याने सतत तीन महिने सराव केल्यामुळेच तो हा विक्रम करू शकला.’’ ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’कडून त्याला पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या