T-10 Cricket : छोट्याशा गावातील रिझवान करणार महाराष्ट्राचे नेतृत्व

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 1 April 2021

दिल्ली येथील टी 10 असोसिएशनतर्फे उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील पंधरा सामने हे डे नाईट स्वरुपात खेळवण्यात येणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील छोट्याशा गावातील खेळाडू टी-10 क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र टी-10 असोसिएशनने नुकतीच महाराष्ट्राच्या संघाची घोषणा केली. यात महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धूरा ही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा गावच्या रिझवान पठाणकडे देण्यात आली आहे. 4 एप्रिलपासून टी-10 स्पर्धेचे सामने दिल्ली आणि ग्रेटर नोएडाच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत.  

दिल्ली येथील टी 10 असोसिएशनतर्फे उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील पंधरा सामने हे डे नाईट स्वरुपात खेळवण्यात येणार आहेत.  या स्पर्धेत  महाराष्ट्राच्या संघासोबतच दिल्ली, पूर्वांचल, उत्तरप्रदेश, जम्मू- काश्मीर संघाचाही समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खानदेशातील नेतृत्वाखालील महाराष्ट्राचा संघ या स्पर्धेत कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.   

IPL 2021 : टाईमपास करणाऱ्या टीमचे पैस कट होणार

कोण आहे स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा रिझवान पठाण 

रिझवान हा महाराष्ट्रातील एक अष्टपैलू खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीसह मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून देत सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता रिझवानमध्ये आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मैदान गाजवणाऱ्या रिझवान अनेक सामन्यात लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली आहे.  

टी 10 स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ
 

रिझवान पठाण (कर्णधार), आकाश गौतील, इश्क शेख, मिथलेश गुनेरिया, दिनेश यादव, डेव्हिड सहारे, विकी रेवातकर, दीपक ठकराण, गुरुप्रीत सिंघ, विश्वेश्वर सिंघ, गुरुप्रीत गिल, अन्वर संकेत, सुरेश हर्षल, इमरान अली, अनमोल दिव्यकृष्णा
प्रशिक्षक जयकुमार बोराडे 


​ ​

संबंधित बातम्या