महेंद्रसिंह धोनी करणार भाजपत प्रवेश?

वृत्तसंस्था
Friday, 12 July 2019

टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्यानंतर इतर खेळाडूंनाही पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. टीम इंडियाचा विद्यमान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी लवकरच निवृत्ती घेऊन भाजपत येणार असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री संजय पावसान यांनी केला आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्यानंतर इतर खेळाडूंनाही पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. टीम इंडियाचा विद्यमान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी लवकरच निवृत्ती घेऊन भाजपत येणार असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री संजय पावसान यांनी केला आहे.

धोनीशी याबाबत चर्चा झाली असून तो सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षाही पासवान यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत भाजपध्यक्ष अमित शाह यांनी धोनीची भेट घेतली होती. धोनीसोबतच इतर सेलिब्रिटींवरही लक्ष असल्याचं संजय पासवान म्हणाले. क्रीडा, सिनेमा, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना भाजपत आणणं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

धोनीला राजकारणात येण्यापूर्वी निवृत्ती जाहीर करावी लागेल. यानंतरच त्याला राजकारणात नशिब आजमावता येईल. धोनीच्या अगोदर अनेक खेळाडूंनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. पंजाबमध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री असलेले नवज्योत सिंह सिद्धू यांनीही भाजपतूनच राजकारणाची सुरुवात केली होती.


​ ​

संबंधित बातम्या