ऑलिंपिक तयारीसाठी राज्यातील खेळाडूंना "बोनस'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

-  पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंच्या यशाचा टक्का वाढावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील ऑलिंपिक पात्र खेळाडूंसाठी घसघशीत बोनसच जाहीर केला आहे.

- शासनाच्या अध्यादेशानुसार एकूण 52 खेळाडूंमध्ये तब्बल 2 कोटी 57 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत. 

पुणे -  पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंच्या यशाचा टक्का वाढावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील ऑलिंपिक पात्र खेळाडूंसाठी घसघशीत बोनसच जाहीर केला आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार एकूण 52 खेळाडूंमध्ये तब्बल 2 कोटी 57 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत. 
निवडक 16 क्रीडा प्रकारातील प्रतित्रा संपन्न खेळाडूंची पात्रता निकषाद्वारे निवड करण्यासाठी स्थापन केलेल्या कार्यकारी समितीने एकूण 42 खेळाडूंची नावे निश्‍चित केली. त्यानंतर नव्याने दहा खेळाडूंची नावे निश्‍चित करण्यात आली असून, या खेळाडूंमध्ये वर्गवारीनुसार निधीचे वितरण करण्यात येणार आहे. 
यामध्ये नेमबाज राही सरनोबत, तिरंदाज प्रविण जाधव या दोघांना सर्वाधिक 50 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी किमान 20 पदके मिळावीत असे निश्‍चित करून हा कृती आराखडा तयार करण्यात आला असला, तरी आर्थिक मदत मंजूर झालेल्या खेळाडूंपैकी बरेचसे खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेले नाहीत किंवा काही क्रीडा प्रकारांचा ऑलिंपिकमध्ये समावेशही नाही. 
------------ 
आर्थिक मदत मिळणारे खेळाडू 
अ श्रेणी (50 लाख) ः राही सरनोबत (नेमबाजी), प्रविण जाधव (तिरंदाजी) 
5 लाख ः प्रार्थन ठोंबरे (टेनिस), मधुरिका पाटकर (टेबल टेनिस), पूजा सहस्त्रबुद्धे (टेबल टेनिस), सनिल शेट्टी (टेबल टेनिस), राहुल आवारे, रेश्‍मा माने, सुरज कोकाटे, विक्रम कुऱ्हाडे (सर्व कुस्ती), ऋतुजा भोसले (टेनिस), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), तेजस्विनी सावंत, स्वप्नील कुसाळे, हिना सिद्धू (तिघी नेमबाजी), 
3 लाख ः सिद्धांत थिंगलिया, स्वीा गाढवे, अर्चना आढाव, दुर्गा देवरे (सर्व ऍथलेटिक्‍स), दिशा निद्रे, आदिती दांडेकर (दोघी रिदमिक जिम्नॅस्टिक), विराज परदेशी (मॉडर्न पेंटॅथलॉन), आयोनिका पॉल, पूजा घाटकर (नेमबाजी), सौरव इगवे (कुस्ती), शशिकला आगाशे (सायकलिंग), स्वाती शिंदे (कुस्ती) 
2 लाख ः हर्षदा वाडेकर (वेटलिफ्टिंग), प्रितम खोत (कुस्ती), अजिंक्‍य दुधारे (तलवारबाजी), मयांके चाफेकर (मॉडर्न पेंटॅथलॉन), उत्कर्ष काळे (कुस्ती), किसन तडवी (ऍथलेटिक्‍स) 
1 लाख ः युगा बिरनाळे, त्रिशा कारखानीस (जलतरण), ओम अवस्थी (डायव्हिंग), अंकिता गोसावी ÷(ऍथलेटिक्‍स), वैदेही देऊळकर (जिम्नॅस्टिक), सनिष आंबेकर (टेबल टेनिस), रविंद्र कोटियान (टेबल टेनिस), अंकिता गुंड (कुस्ती), मोनिका आथरे (ऍथलेटिक्‍स) 
---------- 
नव्याने समावि÷ष्ट केलेले खेळाडू 
5 लाख ः श्‍वेता शर्वेकर (सेलिंग), सुरज करकेरा (हॉकी), श्‍लोक रामचंद्रन (5 लाख), 
3 लाख ः श्रद्धा तळेकर (जिम्नॅस्टिक), सिद्धेश देशपांडे (टेबल टेनिस), पूर्वा बर्वे (बॅडमिंटन), सोनबा गोंगाणे (कुस्ती), साक्षी म्हस्के (वेटलिफ्टिंग) 
2 लाख ः अजिंक्‍य बालवडकर (मॉडर्न पेंटॅथलॉन), मालविका बन्सोड (बॅडमिंटन) 


​ ​

संबंधित बातम्या