महाराष्ट्र केसरी 2020 : आखाडा बनविण्यासाठी लिंबू-कापूर-ताक-तेल
शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्तीचा आखाडा तयार करण्याची पद्धत आगळी असते. मातीवरील कुस्तीसाठी दोन आखाडे बनविण्यात आले आहेत. त्यासाठी मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची 40 ब्रास माती आणण्यात आली.
म्हाळुंगे : बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात शुक्रवारपासून 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होईल. स्पर्धेची तयारी पूर्णत्वास आली असून, यंदा सर्वोच्च प्रतिष्ठेची गदा कोण पटकाविणार, याची उत्कंठा शिगेला पोचली आहे.
गुरुवारी सकाळपासून सुमारे 44 जिल्ह्यांमधून पहिलवानांचे आगमन होऊ लागले. सुमारे 900 ते 950 कुस्तीगीर व सव्वाशे पंच दाखल झाले आहेत. पंचांसाठी उजळणीची दोन सत्रे, 'अ' विभागातील 57 आणि 79 किलो या वजनी गटांतील तब्बल 200 पहिलवानांची आज वैद्यकीय तपासणी व वजने करण्यात आली.
Video : पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार; अभिजित, बाला रफिक मैदानात उतरणार
आखाडा बनविण्यासाठी लिंबू-कापूर-ताक-तेल
शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्तीचा आखाडा तयार करण्याची पद्धत आगळी असते. मातीवरील कुस्तीसाठी दोन आखाडे बनविण्यात आले आहेत. त्यासाठी मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची 40 ब्रास माती आणण्यात आली. एका आखाड्यासाठी 20 ब्रास माती वापरण्यात आली. यात मातीत सुमारे एक हजार लिंबे, 250 किलो हळद, 50 किलो कापूर, 100 लिटर ताक आणि 60 लिटर तेल घालण्यात आले. पहिलवानांना गंभीर जखम होऊ नये, हा यामागील उद्देश असतो. 40 बाय 40 फुटाचे रिंगण व 30 बाय 30 चा प्रत्यक्ष खेळाचा भाग, असा चारही आखाड्यांचा आकार आहे.
- महाराष्ट्र केसरी स्पर्धेस सुरवात १९६१
- दिनकर दह्यारी पहिले महाराष्ट्र केसरी
- पुणे जिल्ह्याला अकरा वेळा स्पर्धा भरवण्याचा मान
- १९ व १९९६ ला स्पर्धा रद्द
- चार वेळा स्पर्धा अनिर्णित
- महाराष्ट्र केसरीची हॅटट्रिक करणारे विजय चौधरी व नरसिंग यादव
- डबल महाराष्ट्र केसरीचे पहिले मानकरी गणपतराव खेडकर