राष्ट्रीय धणुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 May 2019

सोलापूर : कडप्पा (आंद्रप्रदेश) येथे आयोजिलेल्या 64 व्या शालेय राष्ट्रीय धणुर्वीद्या स्पर्धेत 14 वर्षे वयोगट धणुर्वीद्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने एकूण 24 पदके पटकाविली आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या धनुर्धरांनी वैयक्तिक व सांघिकरित्या सात सुवर्ण, 14 रौप्य, तर तीन ब्रॉंझ पदकांची कमाई केली. महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. 

महाराष्ट्राला वयक्तिक गटात इंडियन प्रकारात समीक्षा शेट्टी (मुंबई ) हिने दोन सुवर्ण एक रौप्य, रिकवर प्रकारात आर्या वाले (उस्मानाबाद ) एक सुवर्ण, एक रौप्य पदक कंपाऊंड प्रकारात पायल सूर्यवंशी हिने एक रौप्य, अदिती स्वामी एक ब्रॉंझ (दोन्ही सातारा ), तसेच सांघिक गटात इंडियन प्रकारात श्रावणी पांढरे (अहमदनगर ), समृद्धी शेट्टी (मुंबई ), अणुश्री चांदगुडे (पुणे ), सारा (मुंबई ) यांनी रौप्य पदके पटकाविली.

तसेच रीकवर गटात सांघिक प्रकारात समर्थ कोलरकर (पुणे ), शरविल निकम (सातारा ), निचिकेत बोराडे (नाशिक ), अखिलेश खेडगे (सातारा ) व मुली आर्या वाले (उस्मानाबाद ), श्रेया परदेशी (सोलपूर ), अंजली कचरे व मुक्ता मोडगी ( पुणे) यांनी रौप्य पदके पटकाविली आहेत. तसेच कंपाऊंड प्रकारात पायल सूर्यवंशी, अदिती स्वामी (सातारा ), रूतूजा कसाळ (अहमदनगर ), आरोही दीक्षित (उस्मानाबाद ) यांनी सुवर्ण पदक पटकाविले. या सर्व खेळाडूंना प्रवीण सांवत (सातारा) व विजय फसाटे (अमरावती ) यांनी प्रशिक्षक. तर, संघ व्यवस्थापक म्हणून जरार कुरेशी (सोलापूर ) यांनी काम पाहिले. या संघाचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, धनुर्धर ऍकॅडमीचे दीपक चिकणे, अभिजीत दळवी, प्रा. रमेश शिरसट, राम शिंदे, भरत कोराले, अल्लाऊदिन सय्यद व क्रीडा क्षेत्रातील मान्यवारांनी अभिनंदन केले

​ ​

संबंधित बातम्या