ग्रीको रोमनमध्ये राज्याच्या रोहन रंडेला रौप्यपदक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

- भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रविवारी अखेरच्या दिवशी महाराष्ट्राला केवळ एका रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

- 87 किलो वजनी गटात रोहन रंडे रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

- ग्रीको रोमनमध्ये सेनादलाने 195 गुणांसह विजेतेपद पटकाविले. दिल्लीने दुसरा, तर हरियानाने तिसरा क्रमांक पटकाविला.

पुणे - भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रविवारी अखेरच्या दिवशी महाराष्ट्राला केवळ एका रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यामध्ये 87 किलो वजनी गटात रोहन रंडे रौप्यपदकाचा मानकरी ठरला. या प्रकारात सेनादलाने सर्वसाधारण विजतेपद मिळविले.
शिर्डी येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत अनुकूल "ड्रॉ'चा फायदा उठवत रोहनने अंतिम फेरीपर्यंत सहज आगेकूच केली होती. मात्र, सुवर्णपदकाच्या लढतीत त्याला हरियानाच्या सुनीलचे आव्हान पेलवले नाही. सुनीलने त्याला 40 सेकंदांत चितपट केले. रोहन कोल्हापूरचा असून, मुरगुड येथील सदाशिव मंडलिक कुस्ती केंद्रात तो दादा लवटे यांच्याकडे मार्गदर्शन घेतो. 
ग्रीको रोमनमध्ये सेनादलाने 195 गुणांसह विजेतेपद पटकाविले. दिल्लीने दुसरा, तर हरियानाने तिसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत महाराष्ठ्राने फ्री-स्टाईल प्रकारात एक सुवर्ण, एक रौप्य, दोन ब्रॉंझ; महिला विभागात 1 सुवर्ण, तीन ब्रॉंझ आणि ग्रीको रोमनमधील एक रौप्य अशी एकूण 9 पदके मिळविली. 


​ ​

संबंधित बातम्या